मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बापरे! कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO

बापरे! कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEO

गाडी चालवताना महिलेला आपल्या कारच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये साप (snake in car Glove Box) असल्याचं समजलं.

गाडी चालवताना महिलेला आपल्या कारच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये साप (snake in car Glove Box) असल्याचं समजलं.

गाडी चालवताना महिलेला आपल्या कारच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये साप (snake in car Glove Box) असल्याचं समजलं.

सिडनी, 27 सप्टेंबर : साप (snake) म्हटलं तरी अनेकांना घाम फुटतो. असा साप अचानक तुमच्या समोर आला तर बोबडीच वळते. बरं एखाद्या जंगलात आपल्यासमोर साप येणं ठिक आहे, मात्र अगदी कारमध्येही साप दिसला तर... आपल्या अंगाचं पाणीपाणीच होईल ना. ऑस्ट्रेलियातील एका महिलेच्या बाबतीत हे घडलं. गाडी चालवताना तिला आपल्या कारच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये साप (snake in car Glove Box) असल्याचं समजलं आणि धक्काच बसला.

ही महिला कार चालवत होती. अचानक कारच्या ग्लोव्ह बॉक्समधून काहीतरी बाहेर येत असल्याचं दिसलं आणि हे दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक विषारी साप होता. हा रेड बेली ब्लॅक स्नेक होता. जो विषारी साप आहे.

तेव्हा तिला आपल्या गाडीच्या ग्लोव्ह कम्पार्टमेंटमध्ये साप असल्याचं समजलं, तेव्हा त्या महिलेला धक्काच बसला. तिला भीती वाटत होती. मात्र तिनं सावधगिरीदेखील बाळगली. तिनं आपली कार एका मेडिकल स्टोरसमोर थांबवली आणि तिथून तिनं एका तज्ज्ञाला संपर्क केला. त्यानंतर अँड्र्यु स्मेडली यांना तिथं पाठवण्यात आलं. त्यांनी त्या सापाला हळूहळू त्या कम्पार्टमेंटमधून बाहेर काढलं. अँड्र्यू यांनी आपल्या

हे वाचा - ...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO

अँड्र्यू स्नेक रिमुव्हल या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी हळूच या सापाला बॉक्समधून सुरक्षितरित्या बाहेर काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याआधीदेखील ऑस्ट्रेलियामध्येच कारमधील एका तरुणाला विषारी साप चावला होता. कारच्या ब्रेकजवळ साप बसला होता. युवक गाडीत बसला आणि निघाला त्याने ब्रेक दाबण्यासाठी ब्रेकवर पाय ठेवला असता सापाने युवकावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, सापाने तरुणाला डसल्यानंतर त्याने गाडी थांबवून त्याच्याशी लढण्याचा खूप प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्या सापाने त्याला जखमी केलं होतं.

First published:

Tags: Snake, Viral videos