जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; CRPF जवानाने महिलेवर कोयत्याने केले सपासप वार

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; CRPF जवानाने महिलेवर कोयत्याने केले सपासप वार

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; CRPF जवानाने महिलेवर कोयत्याने केले सपासप वार

Murder in Nanded: मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका सीआरपीएफ (CRPF) जवानाने विवाहित महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नांदेड, 01 जून: मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका सीआरपीएफ (CRPF) जवानाने विवाहित महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी जवानाने महिलेची हत्या (CRPF soldier killed woman) केल्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जवानाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक (Accused Arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत. संबंधित हत्या झालेल्या 40 वर्षीय मृत महिलेचं नाव बेबीबाई भीमराव चव्हाण असून त्या किनवट तालुक्यातील बुरकुलवाडी येथील रहिवासी आहेत. तर आरोपीचं नाव सुरेश धनसिंग राठोड असून ते सेवानिवृत्त सीआरपीएफचे जवान आहेत. आरोपी राठोड सध्या बुरकुलवाडी या आपल्या गावात शेती करत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीने गावातील एका मुलासोबत प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाला मृत बेबीबाई यांनी मदत केल्याचा दाट संशय आरोपी जवान सुरेश राठोड यांना होता. यातूनच त्यांनी बेबीबाई यांची कोयत्याने वार करत हत्या केली आहे. यापूर्वीही मृत बेबीबाई आणि आरोपी जवान राठोड यांच्यात मुलीच्या प्रेमविवाहावरून अनेकदा वाद झाला आहे. ‘मी तुला सोडणार नाही, तुला कधी ना कधी बघून घेतो, अशी धमकीही राठोड याने बेबीबाई यांना दिली होती. यातूनच राठोड यांनी सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास बेबीबाई यांच्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बेबीबाई यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे वाचा- विवाहित प्रियकराने अपहरण करून काढला प्रेयसीचा काटा; धक्कादायक कारण आलं समोर पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा मनोज चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी CRPF जवान सुरेश राठोड याला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात