मुज्जफ्फनगर, 01 जून: एका विवाहित प्रियकराने (Married Lover) आपल्या प्रेयसीचं अपहरण करून तिची हत्या (kidnap and murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकराने हत्या केल्यानंतर प्रेयसीचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला होता. मृत तरुणी घरातून गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा (Missing Complaint) दाखल केला. त्यानंतर गुन्ह्याची तपासणी करत असताना, पोलिसांनी हत्येच गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक (Boyfriend arrest) केली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर याठिकाणी घडली आहे. येथील 24 वर्षीय तरुणी तबस्सुमच मागील काही दिवसांपासून तैमूर नावाच्या एका विवाहित युवकाशी प्रेमसंबंध सुरू होते. आपला प्रियकर विवाहित असूनही प्रेयसी तबस्सुम तैमूरवर लग्नासाठी दबाब आणत होती. यामुळे मृत तबस्सुम आणि तैमूर यांच्या सातत्याने खटके उडत होते. यातूनच प्रेयसीच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रियकर तैमूरने तबस्सुमचं अपहरण केलं. एका अज्ञात स्थळी नेवून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपीने तबस्सुमचा मृतदेह एका कालव्यात फेकून दिला.
दुसरीकडे, आपली मुलगी घरी आली नाही, म्हणून मृताच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. तिचं तैमूर नावाच्या विवाहित युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तैमूरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी तबस्सुमबाबत विचारणा केली. सुरुवातीला तैमूरने उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरूवात केली.
हे ही वाचा-दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कार, बीडमध्ये नात्याला काळीमा
यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताचं त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर तबस्सुमचा मृतदेह एका कालव्यात फेकल्याची माहितीही त्याने दिली. यानंतर पोलिसांनी तबस्सुमचा मृतदेह शोधून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संबंधित हत्या लग्नाचा तगादा लावल्यामुळे केली असल्याची माहिती आरोपी प्रियकराने पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kidnapping, Murder, Uttar pradesh