Home /News /maharashtra /

...अन् जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांपुढे केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक, वाचा कारण

...अन् जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांपुढे केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक, वाचा कारण

Corona Virus: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह संबंधित राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. यामध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील (Rajendra Patil) यांनी पंतप्रधानांपुढे मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) झपाट्यानं वाढत आहे. कोरोना विषाणूवर (Corona Virus) नियंत्रण ठेण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. पण राज्यातील कोरोना स्थिती बिकट होतं असल्याचं लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विरोधी पक्षानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. पण नुकत्याच पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) पार पडलेल्या एका व्हर्च्युअल बैठकीत (Virtual Meeting) थेट जिल्हाधिकाऱ्याकडून उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह संबंधित राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. या संवाद सत्रात सांगली, वर्धा, नाशिक, चंद्रपूर, नागपूर, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, सातारा, बीड, परभणी, पालघर, उस्मानाबाद, जालना आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. संबंधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कोणते प्रयत्न करण्यात आहे? याबाबतचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीनी त्यांच्या जिल्ह्यात केलेल्या प्रयत्नांचं सादरीकरण पंतप्रधान मोदींपुढं केलं. अगदी ऑक्सिजनच्या तुडवड्यापासून ते हिवरेबाजारनं केलेल्या प्रयत्नांची सर्व माहिती डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधानांना दिली. हाच पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबवला जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी जिल्हाधिकारी भोसले यांचं कौतुकही केलं आहे. हे ही वाचा-मोठी बातमी! कोरोनानंतर नाशिक Mucormycosis चा हॉटस्पॉट, 8 बळी तर 166 जण बाधित यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांनी यावेळी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा जिल्ह्याला चांगलाच फायदा झाला. त्याचबरोबर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत असताना सरकारच्या मदतीमुळं प्रशासन थेट ऑक्सिजन प्लांटपर्यंत पोहचू शकलं. त्याचबरोबर गावपातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची विशेष मदत घेण्यात आली. शिवाय कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणात न ठेवता कोविड सेंटरमध्ये ठेवल्याचंही जिल्हाधिकारी भोसले यांनी पंतप्रधानांना सांगितलं. हे ही वाचा-कोरोनाच्या लढाईत नांदेडच्या या ZP सदस्याचं मोलांचं काम, PM मोदींनीही घेतली दखल यावेळी पंतप्रधान यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांच्या कामाचं कौतुक करताना म्हटलं की, कोरोनामुक्तीसाठी गावांनी राबवलेल्या यशस्वी प्रयोगाचं देशपातळीवर अंमलबजावणी केली जाईल. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Narendra modi, Uddhav thackeray

    पुढील बातम्या