अकोला, 17 जुलै : बहीण (siter) आणि भाऊ (brother) हे जगातील सर्वात पवित्र नाते. बहीण सोबत असली की कोणाचीच गरज लागत नाही एक तरी बहीण हवीच तरच घराला घरपण येत असे आपण नेहमी ऐकत आलो. पण हेच बहीण भावाचे नाते आज अकोला (akola) शहरात विकोपाला गेल्याने आते भावाने फक्त हेडफोनसाठी (headphone) बहिणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन (khadan police station) अंतर्गत येणाऱ्या गौरक्षण रोडवरील माधवनगर येथे आते भावाने बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे अकोला शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
आई ती आईच! वाघाच्या जबड्यात लेकीचं डोकं, जीवाची बाजी लावून केली सुटका
गौरक्षण रोडवरील माधवनगर जवळ असलेल्या जय भोले किराणा दुकानाच्याजवळ यादव परिवार गुण्या गोविंदाने राहत होता. सगळं नेहमी सारख सुरळीत सुरू असतात २० वर्षीय बहीण नेहा नंदलाल यादव (neha yadav) व २४ वर्षीय आतेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी यादव (Rishikesh Yadav) यांच्यात भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात ऋषिकेशने नेहावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात नेहाला जबर मार लागला. तिला त्वरित अकोला सरोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी नेहा यादव हिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती खदान पोलिसांना मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतक नेहा हिचा आतेभाऊ बॉबी यादव याला ताब्यात घेतले. या दोघांमध्ये हेडफोनवरुन वाद होवून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतं आहे.
गर्भपाताचं रॅकेट चालविणाऱ्या चौघींचा भयावह VIDEO; उघड्यावर सुरू होता अवैध प्रकार
दरम्यान, आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा मामेभाऊ असून सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरीही हत्येचं नेमकं कारण अद्याप पर्यंत कळू शकले नसून पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder