मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गर्भपाताचं रॅकेट चालविणाऱ्या चौघींचा भयावह VIDEO; उघड्यावर सुरू होता अवैध प्रकार

गर्भपाताचं रॅकेट चालविणाऱ्या चौघींचा भयावह VIDEO; उघड्यावर सुरू होता अवैध प्रकार

अवैध गर्भपात सुरू असताना एका व्यक्तीने हा सर्व प्रकार शूट केला. यामध्ये चार महिला गर्भपात करताना दिसत आहेत.

अवैध गर्भपात सुरू असताना एका व्यक्तीने हा सर्व प्रकार शूट केला. यामध्ये चार महिला गर्भपात करताना दिसत आहेत.

अवैध गर्भपात सुरू असताना एका व्यक्तीने हा सर्व प्रकार शूट केला. यामध्ये चार महिला गर्भपात करताना दिसत आहेत.

अहमदाबाद, 17 जुलै : गुजरातमध्ये (Gujrat) इंटरनेटवर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चार महिला एका महिलेचा गर्भपात करताना दिसत आहेत. (The video shows four women aborting a woman) गुजरातचे आरोग्य मंत्री नितीन पटेल यांनी या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. गुजरातच्या आदिवासी बहुल महिसागर जिल्ह्यात संतरामपुर भागात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यात (फूड काॅरपोरेशन ऑफ इंडिया) एफसीआयच्या गोदामाजवळील एका घरासोर चार महिला एका महिलेचा गर्भपात करताना दिसत आहे. या चारही महिला येथील सरकारी रुग्णालयात नर्स व पॅरामेडिकल स्टाफ म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अवैधपणे गर्भपात करण्याचा व्यवसाय चालवितात. एका नर्सने येथील एक खोली भाड्याने घेतली आहे. अवैधपणे गर्भपातासाठी आलेल्या महिलांना आधी सरकारी रुग्णालयात नेऊन इंजेक्शन दिलं जातं, त्यानंतर त्यांनी घरी आणून अवैधपणे गर्भपात केला जातो. व्हायरल व्हिडीओमध्ये गर्भवती महिलेला जमिनीवर झोपवून चारही महिला तिच्या अवती भोवती दिसत आहेत आणि गर्भपात करीत आहेत.

हे ही वाचा-दहावीच्या रिझल्टनंतर शाळेत राडा; विद्यार्थिनी-कर्मचाऱ्यांमधील मारहाणीचा VIDEO

व्हायरल झालेल्या या व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री नितीन पटेल यांनी सांगितलं की, राज्यात गर्भपात करणं गुन्हा आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडीओमधील घटनेच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहे. यामधील नर्स आणि इतर दोषींची सुटका होणार नाही, तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नर्स फरार असून इतरांचा शोध सुरू आहे. अशा प्रकारचं कृत्य हे धोकादायक असून यामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

 

First published:
top videos

    Tags: Crime news