जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bachchu Kadu : 'या सरकारमध्ये ती क्षमता नाही..' मंत्रीमंडळ विस्ताराव आमदार बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bachchu Kadu : 'या सरकारमध्ये ती क्षमता नाही..' मंत्रीमंडळ विस्ताराव आमदार बच्चू कडू स्पष्टच बोलले

आमदार बच्चू कडू

आमदार बच्चू कडू

Bachchu Kadu : मंत्रीमंडळ विस्तारावरुन प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून सरकारवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 20 जून : ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची नेहमी चर्चा होते. विस्तारावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. प्रत्येकवेळी सरकारमधील मंत्र्यांना मंत्रीमंडळ विस्ताराविषयी विचारले असता लवकरच होणार एव्हढच उत्तर ऐकायला मिळते. आता आमदार बच्चू कडू यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे.

जाहिरात

काय म्हणाले बच्चू कडू? आमदार बच्चू कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल असेल असं वाटतं होतं. दुसऱ्या फेरीत मंत्रिमंडळात निवड होईल असं वाटतं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराल वर्ष लागेल असं वाटतं नव्हत. विस्तार झाला नाही म्हणून नाराज नाही. सरकारने काही कामे चांगली केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तरी मी नाराज नाही. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतं नाही, पुढचा विस्तार हा 2024 मध्ये होईल ती क्षमता या सरकारमध्ये नाही, असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी दिला आहे. वाचा - मोठी बातमी! एक जुलैला ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा; आदित्य ठाकरे करणार नेतृत्व नाराज नाही : बच्चू कडू मी मागितलेले मंत्रालय मिळाले, त्यामुळे किमान माझी तरी सरकारवर काही नाराजी नाही. या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले, यात आम्ही आनंदी आहो. नाही मंत्रिपद दिले तरीही या मंत्रालयाची सेवा करण्यात आम्ही धन्यता मानू. तसंही मंत्री व्हावं, म्हणून माझा अट्टाहास कधीही नव्हता. आम्ही मागून मागून मागितलं काय, तर दिव्यांग मंत्रालय. कारण दिव्यांग बांधवांसाठी मोठे काम करण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचेही आमदार कडू यापूर्वी म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात