मुंबई, 20 जून : शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एक जुलैला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्याचं नेतृत्व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेमकं कायम म्हाणाले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. सरकारला जाब विचारणारं कोणीच नाही. मुंबईत विकास कामाच्या नावानं उधळपट्टी सुरू आहे. शिंदे सरकार बीएमसीमधील ठेवींची उधळपट्टी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंकडून पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की येत्या 1 जुलैला ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढला जाणार आहे, ज्याचं नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा जाब विचार जाईल असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मविआचं स्वागत एक जुलैला ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीतील पक्ष जर सहभाही झाले तर त्यांचं स्वगातच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.