जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sharad Pawar : शरद पवारांबद्दल वादग्रस्त ट्वीट करणारा सौरभ अखेर आला समोर, केला भलताच दावा

Sharad Pawar : शरद पवारांबद्दल वादग्रस्त ट्वीट करणारा सौरभ अखेर आला समोर, केला भलताच दावा

शरद पवार धमकी प्रकरण

शरद पवार धमकी प्रकरण

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोप असलेले भाजप कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 16 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका फेसबुक पेजवरुन देण्यात आली होती. या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर दखल घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. या धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे (34) याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजप कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नावही आले होते. अखेर 7 दिवसांनंतर सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर आला असून आपली भूमिका मांडली आहे. काय म्हणाले सौरभ पिंपळकर? शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर 7 दिवसानंतर माध्यमांसमोर आले. त्यांनी म्हटले की, शरद पवार यांच्या धमकी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. शरद पवार यांचा दाभोळकर होईल, या पोस्टशी माझा काहीच संबंध नाही. मी त्याला ट्विट, शेअर किंवा लाईकसुद्धा केलं नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं. माझ्यावर आरोप केले. मी सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे. वाचा - शिवसेनेच्या जाहिरातीत काय चुकलं? पवारांनी स्पष्टपणेच सांगितलं सौरभ पिंपळकर यांचे ट्वीट काय होतं? मी जे ट्विट केलं होते, त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याच तोंड वाकडं होऊन गेला, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, असे म्हटले होते. त्यात यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हतं. त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु, माझ्यासोबत माझा भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा होता. या प्रकरणाचा माझ्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे माझ्या आई-वडिलांची आणि पक्षाची माफी मागणार का? असा प्रश्न सुद्धा सौरभ पिंपळकर यांनी उपस्थित केला. पुण्यातून एकजण अटकेत शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहरातून सागर बर्वे (वय 34) याला चार दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. त्यानेच शरद पवार यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरुन ‘तुमचा लवकरच दाभोलकर करू’ अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाचे फेसबुक पेज पुण्यातील इंजिनिअर सागर बर्वे चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात