जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bharat Gaikwad : ACP ने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; मग स्वतःलाही संपवलं, घटनेनं पुणे हादरलं

Bharat Gaikwad : ACP ने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; मग स्वतःलाही संपवलं, घटनेनं पुणे हादरलं

एसीपी भरत गायकवाड आणि पत्नी

एसीपी भरत गायकवाड आणि पत्नी

अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, पुणे 24 जुलै : अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. Ankit Murder Case : प्रियकराची हत्या करण्यासाठी सर्पमित्रासोबत ठेवले शारिरीक संबंध, अखेर प्रेयसीला अटक, मोठा खुलासा होणार मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. तर भरत गायकवाड यांनी स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. ही हत्या करण्याचं आणि त्यानंतर आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात