राहुल सिंह, प्रतिनिधी हल्द्वानी, 23 जुलै : उत्तराखंडमधील हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांड समोर आल्यानंतर एकच खळबल उडाली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ माही सिंग हिला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. माहीसोबत तिचा प्रियकर दीप कंदपालही पोलिसांनी ताब्यात घेतले. नैनितालचे एसएसपी पंकज भट्ट आता याप्रकरणाचा खुलासा करणार आहेत. मृत अंकित चौहान हा व्यवसायाने व्यापारी होता. रामपूर रोडवर ऑटो एम्पायर नावाचे त्याचे शोरूम होते. तसेच खानचंद मार्केटमध्ये चौहान कुटुंबाचे एक हॉटेलही आहे. दरम्यान, 14 जुलै रोजी अंकितचा मृतदेह त्याच्या कारच्या मागील सीटवर पडलेला आढळून आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एसएसपी पंकज भट्ट यांनी सांगितले की, ज्याप्रकारे अंकितचा मृतदेह कारमध्ये सापडला, त्यावेळी कारचा एसी चालू होता. यावरून असे मानले जात होते की, एसी गॅसमुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा. मात्र, नंतर त्याच्या शवविच्छेदन अहवालात सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला, असे समोर आल्यानंतर याप्रकरणाच्या तपासाची दिशाच बदलली.
आरोपी सर्पमित्र रमेश नाथ काय म्हणाला - अंकित आणि माही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अंकितच्या मृत्यू प्रकरणी सर्वात आधी सर्पमित्र रमेश नाथ याला अटक करण्यात आली. रमेश नाथ हा अंकितची हत्या करण्यासाठी साप घेऊन आला होता. त्याला अटक केल्यानंतर त्याने पोलीस चौकशीत सर्व सत्य सांगितले. रमेशने पोलिसांना सांगितले की, अंकितच्या खुनाच्या कटात माही, दीप कंदपाल, माहीची मोलकरीण, तिचा नवरा आणि स्वत: सर्पमित्र रमेश नाथ असे एकूण पाच जण सहभागी होते. माही अंकितवर नाराज होती. तो अनेकदा तिच्या घरी येऊन दारू प्यायचा आणि तिला मारहाण करायचा. त्याचा मृत्यू नैसर्गिक वाटावा म्हणून त्याला सर्पदंश करण्यात आले. माहीने सर्पमित्रासोबत ठेवले शारिरीक संबंध - पोलिसांनी सांगितले की, अंकित हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी माही सिंग ही तिच्या आई-वडिलांपासून वेगळी गोरापाडव येथील घरात राहत होती. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, माहीचे वागणे हे योग्य नव्हते. तिच्या घराबाहेर अनेकदा महागडी वाहने उभी केलेली दिसायची. तसेच ती अनेक लोकांसोबत ये-जा करतानाही दिसत होती. अंकितचा खून करण्यासाठी ज्या सर्पमित्राची तिने मदत घेतली, त्याला तिने आपला गुरू मानायला सुरुवात केली होती. तसेच तिने त्याच्याशी दोनदा शारीरिक संबंधही ठेवले होते. अनेक नेते आणि व्यापारी हे माहीच्या संपर्कात होते. त्यामुळे तिच्या चौकशीत अनेक प्रभावशाली लोकांची नावेही समोर येऊ शकतात, असे मानले जात आहे.