अमरावती, 06 सप्टेंबर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंगा प्रकरणावरून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान आमदार रवी राणा यांच्या मालकीच्या भानखेडा शिवारातील गोडाऊनमधून अॅल्युमिनियमचे भोंगे, एम्प्लिफायर, साड्या तथा किराणा साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. (Amravati Ravi Rana) गोडाऊनकिपरच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
राणा यांच्या मालकीच्या दोन गोडाऊनमध्ये गरीब, गरजूंना वाटण्यासाठी किराणा साहित्य ठेवण्यात आले होते. 4 सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास सुशील ठाकूर हे त्या गोडाऊनमध्ये गेले असता, त्यांना दाराची जाळी तुटलेली दिसली. किराणा साहित्य अस्ताव्यस्त दिसले. त्या चोरीची माहिती आमदार राणा यांना देण्यात आली. पाहणी केली असता किराणा साहित्यासह तब्बल 5 लाख 58 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज लांबवल्याचे लक्षात आले.
हे ही वाचा : आदित्य ठाकरे आता किरीट सोमय्यांच्या रडारवर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी
1.55 लाखाचे खाद्यतेल, 600 किलो साखर, 500 पॅकेट चना डाळ, 100 साड्या, ॲल्युमिनियमचे 37 भोंगे, 63 एम्प्लिफायर, 58 जिओ टॅग युनिट एवढा सगळा माल चोरट्यांनी राणा कुटुंबियांच्या गोडावून मधून चोरला आहे. दरम्यान या चोरीची तक्रार देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मी एक महिला आहे त्याशिवाय 25 लाख लोकांमधून निवडून आलेली खासदारही आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाही, तर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. असं असताना उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. अजून तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला आहे.
हे ही वाचा : '..तर आता मंत्रिपदाचा राजीनामा देतो'; त्या शब्दावरुन ट्रोल होताच भडकले आरोग्यमंत्री
देशात सध्या गाजत असलेल्या लव जिहादचा आपण लवकरच खात्मा करणार असून आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. ही तर सुरुवात आहे, पिक्चर तो पुरी बाकी है' असं म्हणून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे. जळगाव शहरातील महाराणा प्रताप मित्र मंडळाच्यावतीने गणरायाची आरती आणि हनुमान चालीसा पठणासाठी राणा दाम्पत्य जळगावात दाखल झाले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Navneet Rana, Ravi rana, अमरावती, अमरावतीamravati, महाराष्ट्र amravati