मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'..तर आता मंत्रिपदाचा राजीनामा देतो'; त्या शब्दावरुन ट्रोल होताच भडकले आरोग्यमंत्री

'..तर आता मंत्रिपदाचा राजीनामा देतो'; त्या शब्दावरुन ट्रोल होताच भडकले आरोग्यमंत्री

पुण्यातील ससून रुग्णालयात गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना झापताना ते म्हणाले , की 'तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधं घेता ते आधी बंद करा'. हाफकीन माणूस आहे की संस्था याबद्दलची माहिती आरोग्यमंत्र्यांना नव्हती, असा उल्लेख एका बातमीत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 06 सप्टेंबर : राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत चांगलेच चर्चेत आहेत. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या त्यांच्या दौऱ्याची बरीच चर्चा झाली होती. यानंतर आता आपल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना झापताना ते म्हणाले , की 'तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधं घेता ते आधी बंद करा'. हाफफीन माणूस आहे की संस्था याबद्दलची माहिती आरोग्यमंत्र्यांना नव्हती, असा उल्लेख एका बातमीच्या कात्रणात आला आहे. यानंतर आरोग्यमंत्री चांगलेच ट्रोल झाले आहेत.

'मिशन 2024'साठी नितीश दिल्लीत, राहुल गांधींना भेटल्यानंतर आता शरद पवारांकडे!

आता यावर प्रतिक्रिया देत तानाजी सावंत यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. तानाजी सावंत म्हणाले, की काही जणांना शिंदे सरकार आलेलं रुचत नाही. माध्यमांनी माझं शिक्षण बघावं, सोलापूरमध्ये शिक्षण झालं, त्यावेळेस मी टॉपचा विद्यार्थी होतो. माझं शिक्षण डिग्रीपासून पीएचडीपर्यंत झालं आहे. हाफकीन या माणसाकडून औषधं घेऊ नका, असं म्हणायला मी मूर्ख आहे का? असा सवाल त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले, की एकदा माझ्या प्रोफाईलवर जाऊन बघावं. किती संस्था, किती कारखाने त्यात किती स्टाफ आहे ते पाहावं. तुम्हाला मी अंगठा बहादूर मंत्री आहे असं वाटतं का? असा सवालही त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, की हाफकीन या विषयावर मी बोललो असेल तर आत्ता मंत्रिपदाचा राजीनामा लिहून देतो.

शिंदे-ठाकरेंमध्ये पहिली लढत, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत बोलताना ते म्हणाले, की हा जनतेच्या मनातील उठाव आहे. आमच्या मनातील नाही, किंवा भाजपला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाटतं म्हणून हा उठाव केला नाही. तर हा जनतेचा आक्रोश होता. हा उठाव आम्ही जनतेच्या विरोधात जाऊन जर केला असेल तर जनता आम्हाला आमची जागा दाखवेल. असंही ते म्हणाले.

First published:

Tags: Maharashtra political news