अमरावती, 28 मार्च : महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या दीपाली चव्हाण आत्महत्या (Deepali Chavan) प्रकरणात अखेर विरोधकांना जाग आली आहे. या प्रकरणात निलंबित झालेल्या DFO विनोद शिवकुमार याला अटक केल्यानंतर आता अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल करावे आणि निलंबित करावे, अशी मागणी अमरावती जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या आता राजकीय आखाडा तापू लागला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडली आहे. नवनीत राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याकडे एक तक्रार केली आहे. निर्बंध नसल्यास 1 महिन्यात 1 कोरोना रुग्ण 406 जणांना बाधित करतो, केंद्राचा इशारा ‘आपण स्वतः दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डी यांच्याकडे 10 वेळा फोन केले आणि रवी राणा यांनी सुद्धा रेड्डी तसेच वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा रेड्डी यांच्याकडे मागणी केली असताना रेड्डी यांनी सातत्याने डी एफ ओ शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न केले त्यामुळे रेड्डी सुद्धा शिवकुमार एवढेच दोषी असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. येत्या चार दिवसांत रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास आपण स्वतः राज्यपाल व संसदेत हा मुद्दा लावून धरू, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. काय आहे प्रकरण? अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस तपास करत आहे. ‘DFO ला फाशी द्या किंवा मला फाशी द्या’ ‘माझ्या मुलीला खूप दिवसापासून या अधिकाऱ्यांचा त्रास होत होता, DFO शिवकुमार हे अधिकारी नेहमीच घराबाहेर चकरा मारत होते आणि दीपालीला शिवीगाळ करत होते, त्यामुळे त्यांना कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी नाही दिली तर मला फाशी द्या’, अशी मागणी मृत दिपाली चव्हाण यांची आई शकुंतला चव्हाण यांनी केली. चिंतेत वाढ! दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग तर दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी देखील या घटनेबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘माझ्या पत्नीने वारंवार वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. सोबतच या प्रकारचे पत्रव्यवहारही केले होते. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. माझ्या पत्नीला शिवकुमार अधिकारी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत होते, त्यामुळे तिने त्रस्त झाल्याने हे पाऊल उचलले.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.