• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • चिंतेत वाढ! दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग

चिंतेत वाढ! दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग

दहा वर्षाखालील मुलं जास्त प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात (Increasing Number of Corona Infection Among Childrens) येत असल्याचं चित्र आहे. या वयोगटातील रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे.

 • Share this:
  बंगळुरू 28 मार्च : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus 2nd Wave) दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यादरम्यान कर्नाटकची राजधानी बंगळुरूनं चिंतेत आणखी भर टाकली आहे. इथे दहा वर्षाखालील मुलं जास्त प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात (Increasing Number of Corona Infection Among Childrens येत असल्याचं चित्र आहे. या वयोगटातील रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या महिन्यात दहा वर्षाखालील 472 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारपर्यंत हा आकडा 500 पार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील वर्षीपेक्षा जास्त मुलांना विषाणूची लागण होत आहे. अनेक लहान मुलं आता बाहेर फिरण्यासाठी जात आहेत. त्यामुळे, प्रसार अधिक झपाट्यानं होत आहे. या महिन्यात आढळून आलेल्या 472 रुग्णांपैकी 244 मुलं आहेत. तर मुलींची संख्या 228 आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये कोरोनासाठी गठीत करण्यात आलेल्या टेक्निकल अॅडव्हायजरी कमेटीच्या सदस्यानं सांगितलं, की कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता ते चिंतेत आहेत. त्यांनी सांगितलं, की एका वर्षाआधी लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण अतिशय कमी होतं. कारण लोकं जास्त बाहेर फिरत नव्हते. लॉकडाऊनमुळे सगळे घरांमध्ये बंद होते. मात्र, आता मुलं पार्कमध्ये जात आहेत तसंच अपार्टमेंटच्या खाली खेळण्यासाठी जात आहेत. ते पुढे म्हणाले, की मुलंदेखील कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरू शकतात. जाणकारांचं असं म्हणणं आहे, की योग्य पद्धतीनं मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन मुलांकडून कमी होत असतं. कमेटीच्या सदस्यांचं असं म्हणणं आहे, की जेव्हा मुलं आपल्या पालकांसोबत कार्यक्रमांना जातात तेव्हा ते गर्दीमध्ये जातात. अशा वातावरणात मुलांना सर्वाधिक धोका असतो.
  Published by:Kiran Pharate
  First published: