Home /News /maharashtra /

अंबरनाथमध्ये रशियाहून आलेल्या 7 वर्षाच्या चिमुकलीला कोरोना, मुलीचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले

अंबरनाथमध्ये रशियाहून आलेल्या 7 वर्षाच्या चिमुकलीला कोरोना, मुलीचे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) शहरातून एक वाईट बातमी समोर आली. अंबरनाथमध्ये रशिया फिरुन आलेल्या एक 7 वर्षीय मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे.

ठाणे, 3 डिसेंबर : जगभरातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालणारा कोरोनाचा ओमायक्रोन (Omicron) हा नवा विषाणू भारतात देखील दाखल झाला आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यात दोन जणांना ओमायक्रोन विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची (Maharashtra) देखील चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात परदेशातून आलेल्या 9 प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काहीजण असे एकूण 28 जणांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी एकाही जणाचा रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) शहरातून एक वाईट बातमी समोर आली. अंबरनाथमध्ये रशिया फिरुन आलेल्या एक 7 वर्षीय मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. या मुलीचे स्वॅब आता जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

मुलीच्या वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह

संबंधित सात वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत रशिया फिरायला गेली होती. ती आपल्या आई-वडिलांसह 28 नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर दाखल झाली होती. अंबरनाथला आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी मुलीला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट आता समोर आली आहे. त्यात तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या आई-वडिलांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी वडिलांचा रिपोर्ट हा कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर आईचा कोरोना रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. हेही वाचा : राज ठाकरे पुन्हा एकदा सज्ज, महाराष्ट्र दौरा करणार, बैठकींचा सिलसिला सुरु

कुटुंब क्वारंटाईन, इमारत सील

मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पालिका सतर्क झाली आहे. पालिकेने मुलीसह तिच्या आई-वडिलांना क्वारंटाईन केलं आहे. तसेच संबंधित कुटुंब ज्या इमारतीत राहतं ती इमारत सील करण्यात आली आहे. मुलीचे स्वॅब आता जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबई, कल्याण-डोंबिवली पाठोपाठ अंबरनाथमध्येही धाकधूक वाढली आहे. हेही वाचा : मोठा दिलासा ! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या 'त्या' कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहप्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह

कर्नाटकात दोघांना ओमायक्रोन

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. विशेष म्हणजे जगभरात जे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत त्यांच्यातदेखील आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळले असल्याची माहिती समोर आल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या