COVID-19 च्या सर्व चाचण्या व उपचार निशुल्क, सरकारनं घेतला मोठा निर्णय

COVID-19 च्या सर्व चाचण्या व उपचार निशुल्क, सरकारनं घेतला मोठा निर्णय

COVID-19 अर्थात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व चाचण्या व उपचाराबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल: COVID-19 अर्थात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व चाचण्या व उपचाराबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यांनी शुक्रवारी दिली आहे.

राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा येणार आहे.

हेही वाचा..मुंबईबरोबर ठाणेही वाढवतंय चिंता; हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या वाढली

जागतिक आरोग्य संघटनेकडून COVID-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये COVID-19 संदर्भातील रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार यापुढे निशुल्क करण्यात आले आहेत. COVID-19 ग्रस्त रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत व यावर उपचार घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा.. कोरोनाच्या उपचारासंदर्भात मोठी बातमी, महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी

COVID-19 ग्रस्त रुग्णावर उपचारासाठी अधिक पैसे लागतील, या भीतीपोटी अनेक रुग्ण आपला आजार लपवतात, असा अनुभव आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक रुग्ण पुढे येऊन स्वतः वर उपचार करून घेतील त्याचप्रमाणे या निर्णयामुळे अधिकाधिक चाचण्या घेणे शक्य होणार असल्याने COVID-19ला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही अमित विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 24, 2020, 9:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading