अकोला, 10 जानेवारी : उद्धव ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीश देशमुख यांना एसीबीने नोटीस बजावली आहे. त्यांना 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा यांनी यावरुन नितीश देशमुख यांच्या पापाचा घडा भरल्याची टीका केली होती. आता नितीन देशमुख यांनी याला प्रत्युत्तर दिलं आहे. नितीन देशमुख बायकोच्या भरवश्यावर राजकारण करणारा माणूस नाही. जे लोक बायकोच्या भरवश्यावर राजकारण करतात त्यांच्या पापाचा घडा भरत असतो, असा टोला देशमुख यांनी राणा यांना लगावला आहे.
मराठी माणूस जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही : नितीन देशमुख
ज्या रवी रणाला त्याची जन्मूभूमी माहिती नाही. त्याला मराठी माणसांनी मोठं केलं तोच मराठी माणूस त्याला त्याची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही, अशी जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आमदार रवी राणा यांच्या टिकेकर प्रतिउत्तर देत केलीय.
वाचा - 'पवार घराण्याला उपटून टाकणार', गोपीचंद पडळकर थेट बोलले
..तर किरीट सोमय्यांचे घर मला एसीबीने खाली करून द्यावे : नितीन देशमुख
बेहिशोबी मालमत्ता काय असते हे मला कळत नाही. जर स्वतःची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर घेतली म्हणजे बेहिशोबी मालमत्ता होत असेल, तर किरीट सोमय्यांचे घर मीच घेऊन दिल आहे. एसीबीने ते घर मला खाली करून घ्या आणि बेहिशोबी मालमत्ता म्हणून मला जेलात टाकलं तरी चालेल, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. अशी प्रॉपर्टी मला मिळत असेल आणि त्यासाठी आनंदाने जेलातही जायला तयार आहे. म्हणून किरीट सोमय्यांचे घर मला एसीबीने खाली करून ताब्यात द्यावे, अशी मागणी नितीन देशमुखांनी केली आहे.
जे कोणी माझ्यावर वक्तव्य करत आहे ते बिना तेलाचे दिवे : आमदार रवी राणा
आमदार नितीन देशमुख यांनि आमदार रवी राणा हे बायकोच्या भरोवशावर राजकारण करत आहे, अशी टीका केल्यानंतर त्याला आ. राणा यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत जे जे लोक आहे त्यांचा पापाचा घडा भरला आहे. जे काही माझ्या विरोधात वक्तव्य करत आहे हे बिना तेलाचे दिवे आहे, ते फडफड करत असतात, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. ज्या व्यक्तीने माझ्यावर टीका केली त्याला माझं सांगणं आहे ज्याने विधानभवनाच्या गेट वर पोलिसांना मारहाण केली, त्याच्यावर 353 दाखल आहे, त्यामुळे हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या विरोधात जे कोणी काम करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाही करण्याची पूर्ण ताकद या सरकारमध्ये आहे. बोटावर मोजण्या एवढे लोक उद्धव ठाकरेसोबत आहे, त्यापैकी तीनच लोक त्यांच्यासोबत राहील अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.