मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'पवार घराण्याला उपटून टाकणार', गोपीचंद पडळकर थेट बोलले

'पवार घराण्याला उपटून टाकणार', गोपीचंद पडळकर थेट बोलले

महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महापुरुषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात.

महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महापुरुषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात.

अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती घेतलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad Cantonment, India

औरंगाबाद, 10 जानेवारी : 'अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती घेतलं आहे. अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले आहे, होय मी उपटसुंभा आहे' असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट पवार घराण्यावर विखारी टीका केली आहे.

औरंगाबादमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबाला टार्गेट केलं.

'सत्तेत यायचं आणि सत्तेच्या चाव्या ताब्यात घ्यायचे, अरेरावीची भाषा करायची यांना सगळ्यांना सरळ करण्याचं काम मी करणार आहे. तुम्ही फक्त पाठबळ द्या, नाही त्यांना बेजार केलं तर माझं नाव गोपीचंद पडळकर नाही. अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती घेतलं आहे. अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले आहे, होय मी उपटसुंभा आहे, असं पडळकर म्हणाले.

(Shivsena Vs Shinde : 'सगळं प्रेमाने होईल', 14 तारखेच्या सुनावणीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया)

'पवारांना बोलायला लोक घाबरतात. नीती खुंटली का तुमची. तुम्हाला माहिती आहे मी कुणाला बोलायला घाबरत नाही. ही लोक आमच्यामुळे मोठी झाली आहे. ज्या पद्धतीने फुले, शाहु-आंबेडकर यांचं नाव घेऊन बहुजनांवर अन्याय केला, हे पाप करण्यात पवार कुटुंबीय नंबर वनवर आहे. यांनी आपल्याला वर येऊ दिलं. दुष्काळी पट्यात त्यांनी काम केलं नाही. लोकांना पाणी दिलं नाही, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

(Sharad pawar : शस्त्रक्रिया यशस्वी, शरद पवारांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज)

तसंच, आठवले-कवाडे आणि शिंदे गट युतीवर बोलण्यास मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचे ही समाजात मोठे स्थान आहे. त्यांची ताकद मला माहित आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सोबत जाऊन माती केली आहे. त्यामुळे त्यांना यातून बाहेर यायला अनेक वर्षे लागतील. छोट्या छोट्या समूहाच्या राजकीय गटांना महत्त्व येणार आहे. मात्र तरुणांनी आपले भवितव्य ओळखले पाहिजे अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली.

First published:

Tags: अजित पवार