मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सणासुदीच्या काळात स्वाईन फ्लूचा कहर; प्रशासन अलर्ट

सणासुदीच्या काळात स्वाईन फ्लूचा कहर; प्रशासन अलर्ट

X
सध्या

सध्या राज्याच्या विविध भागात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. शिवाय या स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यात या आजाराने आतापर्यंत एक जणाचा ऐन सणासुदीच्या काळात मृत्यू झाला आहे.

सध्या राज्याच्या विविध भागात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. शिवाय या स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यात या आजाराने आतापर्यंत एक जणाचा ऐन सणासुदीच्या काळात मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India

अकोला, 23 ऑगस्ट : पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या राज्याच्या विविध भागात स्वाईन फ्लूने (Swine flu) थैमान घातले आहे. शिवाय या स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अकोला जिल्ह्यात या आजाराने आतापर्यंत एक जणाचा ऐन सणासुदीच्या काळात मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वातावरणातील बदल आणि कोसळणारा पाऊस यामुळे अकोल्यातील तापमानात घसरण झाली आहे. यात साथीच्या आजारामुळे डोकं वर काढले आहे. व्हायरल तापाचे प्रमाण सर्वाधिक असून स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराने आतापर्यंत एक जण दगावला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण हे अकोला शहरातील जठारपेठ इंदिरा नगर, रेणुका नगर या भागातील आहेत. यातील दोन रुग्णांची टेस्ट ही नागपुरला करण्यात आली होती. वाढत्या आजारावर प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. शहरात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळले आहेत. रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांची सर्वेक्षण करून तपासणी करण्यात येत आहे. यासाठी अकोला महापालिका प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा- भेळ अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी; ‘अंबिका’ने जपली 39 वर्षांची परंपरा, पाहा Photos

स्वाइन फ्लूची लक्षणे

सर्दी, ताप येणे, साधारण खोकला, श्वास घेण्यास त्रास. स्वाईन फ्लू आणि कोरोनाचे लक्षणे जवळपास सारखेच आहेत. लक्षणे आढळताच नागरिकांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अकोल्यात सध्या एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे तर इतर दोन रुग्णांपैकी एकाला उपचाराअंती डिस्चार्ज मिळाला असून एका रुग्णाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्याचा पॉझिटिव्ह रुग्ण अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.  

हेही वाचा- कपिला'च्या डोहाळ जेवणाची चर्चा तर होणारच, अनोखा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे पाहा Photos

कुणीही घाबरून नये

रुग्णाच्या संपर्कातील कोणालाही लक्षणे आढळले नाहीत. महानगरपालिकेकडून निर्जंतुकीकरणाची फवारणी केली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, हा विषाणू हवेतून पसरतो. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावर कुणीही घाबरून जाऊ नये. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्यात आले होते तसेच स्वाईन प्लूसाठी करावे,  असा सल्ला अकोला महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी अस्मिता पाठक यांनी दिला आहे.

First published:

Tags: Akola, Akola News, Swine flu in india