डाळीचे पीठ, तेल, आणि शाम्पू लावून गाईला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आली. कपिलासाठी सोळा प्रकारचा श्रृंगार साज चढवण्यात आला. यात नथ, कंबरपट्टा, मंगळसूत्र, पायातले, सरी बांगड्या, मोत्याची नथ, हळद, कुंकू, कानातले, फुलांचा हार, याचा समावेश करण्यात आला ही संपूर्ण सजावट नम्रता देशमुख यांनी केली.