बीड, 20 ऑगस्ट: पावसाळ्यात आपल्या वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. लहान असो की मोठे सर्वांना भेळ, पाणीपुरी खायला आवडते. त्यात टेस्टी आणि यम्मी, चटपतीट भेळ पाणीपुरी कुठे मिळत असेल तर आपण आवर्जुन तिथे जातो.
अनेकजण चहासोबत कांदा भजी, बटाटा वड्यांचा आस्वाद घेतात. मात्र आता चहासोबत चटपटीत भेळ खाण्याच ट्रेन्ड देखील वाढत आहे. बीड शहरातील यशवंत उद्यान समोर मागील 35 वर्षापासून चवदार आणि चटपटीत भेळ अंबिक भेळ सेंटमध्ये मिळते.
धोंडीबा राऊत यांनी 1972 साली एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. नंतर ते काम सोडून 1983 रोजी यशवंत उद्यान समोर पेठ बीड परिसरात पाणीपुरीचा गाडा टाकला. ग्राहक भेळ या पदार्थाला आवडीने खातील का नाही अशी चिंता होती मात्र धोंडीबांच्या हाताला असणारी चव खवय्यांना भेळकडे आकर्षित करू लागली.
स्पेशल भेळ. सुकी भेळ. कट कचोरी. मसाला भजे. रगडा कचोरी. रगडा पकवान. स्पेशल फरसाण पाणीपुरी. स्पेशल पापडी अंबिका भेळ सेंटर असे दहापेक्षा अधिक पदार्थ विक्रीसाठी आहेत.
स्वादिष्ट फरसाण, गावरान मटकी, चिंच, गुळाचे पाणी, कांदा व घरगुती मसाल्याच्या अद्भुत मिश्रणातून भेळ तयार होते. त्यावर टोमॅटो, कच्चा कांदा आणि कोथिंबीरने सजवून यावर शेव टाकली जाते. संध्याकाळी 3 ते रात्री 10 पर्यंत भेळची विक्री होती.दिवसाकाठी 150 पेक्षा अधिक भेळच्या प्लेटची विक्री होते.
40 पैशाने सुरू झालीले प्लेट आता 20 रुपयेपर्यंत पोहोचली आहे. मात्र, या 39 वर्षांच्या काळात चवदार भेळ आजही खवय्यांच्या तोंडाला पाणी आणते. चव, दर्जा, स्वच्छता, या सर्वांमध्ये कधीच तडजोड केलेली नाही. यामुळे खवय्यांची संख्या कधी झाली नसल्याचे बाबुराव धोंडीबा राऊत सांगतात.