नवी दिल्ली, 17 जानेवारी : धनुष्यबाण कुणाचे या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. निवडणूक आयोगामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार? या संदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय देतं हे पाहण्याचे ठरणार आहे.
धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. मागील आठवड्यात 10 जानेवारी मंगळवारी यावर दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद झाला.
(Davos World Economic Forum : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दावोसमधील PHOTO)
उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आला होता. तर सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षावर निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान केली होती. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आतापर्यंत नेमकं काय झालं?
25 ऑगस्ट - घटनापीठात ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाकडून दावे
6 सप्टेंबर - संबंधित सर्व प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय
27 सप्टेंबर - उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळत खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे
4 ऑक्टोबर - धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका
7 ऑक्टोबर - चिन्हावर हक्क सांगणारी कागदपत्रं दोन्ही पक्षांकडून सुपूर्द
8 ऑक्टोबर - दोन्ही पक्षांना शिवसेनेचं नाव, निवडणूक चिन्ह न वापरण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश
11 ऑक्टोबर - अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह
9 डिसेंबर - ठाकरेंच्या पक्षाकडून 20 लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र तर शिंदेंच्या पक्षाकडून 10.3 लाख सदस्यांचे फॉर्म, 1.8 लाख प्रतिज्ञापत्र सादर
11 डिसेंबर - सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद
10 जानेवारी- 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार
गेल्या सुनावणीच्या वेळी ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगात काय युक्तिवाद केला होता?
- सुप्रीम कोर्टात सुनावणी अद्याप बाकी आहे
- सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निर्णय नको
- आयोगातील युक्तीवाद प्राथमिक की अंतिम?
- कोर्टाने बंडखोरांना अपात्र ठरवल्यास आयोगाचा कोणताही निर्णय हास्यास्पद ठरेल
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा युक्तिवाद
- अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नाही
- धनुष्यबाण कुणाचा हे ठरवण्यात अडथळा नाही
- आमदार, खासदारांची आमच्याकडे जास्त संख्या
- बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची
- सर्व निकषांवर शिंदे गटच सरस
- शिवसेनेची जुनी घटना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती
- उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली
- उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतलं
- मात्र ते शिवसेनाप्रमुख होत नाहीत
- बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव यांनी स्वतःकडे अधिकार घेतले
- शिवसेनेच्या घटनेत उद्धव यांनी केलेला बदल बोगस आणि बेकायदेशीर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivseana