मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /500 वर्षांचा इतिहास असलेलं राजराजेश्वर मंदिर, कावड यात्रेचीही मोठी परंपरा! VIDEO

500 वर्षांचा इतिहास असलेलं राजराजेश्वर मंदिर, कावड यात्रेचीही मोठी परंपरा! VIDEO

X
श्रावण

श्रावण महिन्याच्या (Shravan) शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वरला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक घातला जातो. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.

श्रावण महिन्याच्या (Shravan) शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वरला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक घातला जातो. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.

    अकोला, 22 ऑगस्ट : श्रावण महिन्याच्या (Shravan) शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वरला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक घातला जातो. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. अकोलेकरांचे ग्रामदैवत असणाऱ्या राजराजेश्वराबद्दल अनेक आख्यायिका देखील आहेत. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते. जवळपास 500 वर्षाचा मंदिराला Raj Rajeshwer Temple Akola) इतिहास असून जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ओळख आहे.

    श्रावणात महिन्यातील सोमवारी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात. कोरोना काळात गेली दोन वर्ष मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. मात्र, यावर्षी हे मंदिर भक्तांसाठी खुले झालेला आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. प्राचीन ऐतिहासिक असे हे मंदिर आहे. अकोला शहरातील जुने शहर भागात असलेले हे मंदीर अकोला शहराचे ग्रामदैवत आहे. सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास मंदिराला आहे. संपूर्ण अकोला जिल्ह्यातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. राज राजेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकरांचे मंदिर आहे. शंकराची पिंड असलेले हे मंदिर अतिशय पुरातन आहे. जागेचा परिसर पहिल्यापासूनच मोठा आहे. त्यामुळे मंदिरांची जागा सोडून अन्य आवार अतिशय मोठे आहे. श्रावणातील सोमवारी हजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी जिल्हाभरातून येतात.

    हेही वाचा- नर मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

    महादेवाची पिंड दोन भागात विभाजित झाली...

    राज राजेश्वर मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते की, पूर्वी मोर्णा नदीकाठी आणि मंदिराच्या शेजारी असलेल्या असदगड किल्ल्यात अकोलसिंह नावाचा एक राजा रहायचा. त्यावेळेस त्याची पत्नी राजराजेश्वराची भक्ती करायची. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी  म्हणजेच अंधारातच किल्ल्याबाहेर पडून महादेवाची पूजा करण्यासाठी जात असायची. दररोज सकाळी न सांगता ती किल्ल्या बाहेर पडायची. राजाला राणीवर संशय आला आणि एके दिवशी तो रागाने तिचा पाठलाग करू लागला. त्या दिवशी ती महादेवाच्या मंदिरात जात असल्याचे बघून तो संतापला. तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावला. राणी घाबरून राजराजेश्वराचा धावा करू लागली. तेव्हा प्रार्थना ऐकून वाचवण्यासाठी महादेवाची पिंड दोन भागात विभाजित झाली व राणीला आपल्यात सामावून घेतले. तेव्हापासून येथे राजराजेश्वराचे मंदिर आहे.

    Raj Rajeshwer Temple Akola

    गुगल मॅपवरून साभार

    राजराजेश्वर नगरी मध्ये राजराजेश्वराचे खूप महत्त्व आहे. हे मंदिर जागृत देवस्थान असून, आज श्रावणातला शेवटचा दिवस असल्याने या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे भाविक रगडे यांनी सांगितले. कोरोनानंतर यावर्षी मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत असल्याने खूप छान वाटत आहे, असे भाविक अतुल जैस्वाल यांनी सांगितले.

    हेही वाचा- ऐतिहासिक वारसा आणि दारूगोळ्याचे भंडार असलेला परांडा किल्ला

     शिवलिंग  स्वयंभू प्रकटले 

    पाचशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून येथील शिवलिंग हे स्वयंभू प्रकटले होते. अकोलेकर या राजराजेश्वरला आराध्यदैवत मानतात आणि दररोज राज राजराजेश्वराचे दर्शन घेऊनच आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात. राजराजेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात मोठे उत्सव साजरे केले जातात, श्रावणातल्या चारही सोमवारी या ठिकाणी कावड आणली जाते. श्रावणातल्या चौथ्या सोमवारी या ठिकाणी गांधीग्राम येथून कावड आणि पालखी आणून राजराजेश्वरला जल अभिषेक केला जात, असल्याचं राजराजेश्वर मंदिराचे विश्वस्त नरेश लोहिया सांगतात.

    First published:

    Tags: Akola, Akola News, Temple, अकोला, मंदिर