उस्मानाबाद , 17 ऑगस्ट : उस्मानाबादच्या भूमीत काही भरभक्कम किल्ले आजही उभे आहेत. त्यापैकी परंडा किल्ला (Paranda Fort) हा एक अप्रतीम भुईकोट किल्ला आहे. परांडा या तालुक्याच्या गावात हा किल्ला असून हा किल्ला पाहाण्यासाठी अनेक पर्यटक याठीकाणी येत असतात. परंडा हा प्राचीन किल्ला आजही चांगल्या अवस्थेत उभा आहे. या किल्ल्याच्या भिंती आणि यावर असणार्या विवीध तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. बार्शीच्या पश्चिमेस सीना व तिच्या उपनद्यांदरम्यान परांडा शहर वसले आहे. पुराणात याचा उल्लेख परमधामपूर या नावाने आढळतो. पुढे त्यास प्रचंडपूर म्हणू लागले आणि त्यानंतर परांडा हे नाव रूढ झाले. येथे नगरपालिका असून सर्व तहसील कार्यालये आहेत. गावाच्या मध्यवस्तीत परांडा हा भुईकोट किल्ला आहे. त्याच्याभोवती खंदक आहे आणि 26 बुरूजांच्या तटांच्या आत काही वास्तू व एक मशीद आहे. मशिदीचे स्तंभवरील जाळीकाम मुसलमानपूर्व काळातील हिंदू मंदिरांची शैली सूचित करतात. सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध परांडा या किल्ल्याला विशिष्ट अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेली आहे. कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा हा एक महत्त्वाचा परगणा होता. बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा महमूद गवान याने तो बांधला. हा भूईकोट किल्ला परंडा शहराच्या मधोमध आहे. हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य - अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी मुलुख मैदान तोफ होती. विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली. यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिह मंदिर तसेच एक मशिद आहे. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती आहेत. किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे.
काढता घालता येईल असा पूल किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. संपूर्ण किल्ल्याच्या सभोवती खंदक खोदलेला आहे. गडाच्या ईशान्य दिशेला प्रवेश करण्यासाठी पूल बांधलेला आहे. वेळप्रसंगी तो काढूनही ठेवता येईल अशी सोय केलेली आहे. गडाचे पहिले प्रवेशव्दार खूप भव्य आहे. त्याची लाकडी दारे आजही टिकून आहेत. पूलावरुन चालत गेल्यावर थेट पहिल्या प्रवेशव्दारातच आपण शिरतो. पहिल्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डावीकडे वळल्यावर दुसरे प्रवेशव्दार लागते. किल्ल्याच्या उत्तरेस ईशान्य बाजूस खंदकावरून आत प्रवेश करण्यासाठी पूल बांधलेला असुन पुर्वीच्या काळी हा पूल लाकडी असून काढता घालता येत असे त्यामुळे हा पूल नसताना किल्ल्यांत प्रवेश करणे शक्य नसे. गडाचा पहिला दरवाजा खुप मोठा आहे. हेही वाचा-
दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई
1630 च्या सुमारास शहाजी महाराजांच्या ताब्यात किल्ला हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने हा किल्ला सुमारे 15 व्या शतकाच्या बांधला.इ.स. 1599 मध्ये मुघल सैन्य अहमदनगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगर च्या आग्नेयेला सुमारे 80 मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली. नंतर परंडा राजधानी राहिली.इ.स. 1630 च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला त्याब्यात होता.
मोगलांनी काही काळ या किल्ल्यावर वर्चस्व गाजविले. आदिलशाहाने 1630 मध्ये हा किल्ला जिंकल आणि तेथील मूलूक मैदान हि मोठी तोफ विजापूरला नेली. विजापूरची आदिलशाही व दिल्लीचे मोगल यांच्या ताब्यात हा किल्ला राहिला. पेशवाईत त्याला फारसे महत्त्व राहिले नाही अशी माहिती सब्बदार सय्यद यांनी दिली.
गुगल मॅपवरून साभार हेही वाचा-
शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई
या ठिकाणी कसे यावे परंडा हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबाद आणि सोलापूर यांच्या हद्दीवर येते. सोलापूरहून बार्शी मार्गे परंड्या यायला बर्याच एसटी बसेस आहेत. बार्शी परंडा 27 किमी अंतर आहे. ट्रेनने यायचे असल्यास कुर्डुवाडी येथे उतरावे. कुर्डुवाडी ते परंडा अशी बससेवा दर अर्ध्यातासाला आहे. पूण्याहून भूमला जाणारी गाडी परंडाला जाते. परंडा किल्ला गावातच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.