जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Osmanabad : नर-मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Osmanabad : नर-मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

नर मादी धबधबा

नर मादी धबधबा

नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा (Nar madi waterfall) प्रेक्षणीय आहे. वर्षा सहलीसाठी धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची (tourists) गर्दी या ठिकाणी वाढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    उस्मानाबाद , 16 ऑगस्ट : महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग मधील ऐतिहासिक किल्ल्यातील (Naldurg fort)   मुख्य नर व मादी हे दोन्ही धबधबे वाहू लागली आहेत. गेल्या काही दिवसापासून सततच्या पावसाने या पर्यटन स्थळाचे सौंदर्य खुलले आहे. किल्ल्यातील नर-मादी धबधबा (Nar madi waterfall) प्रेक्षणीय आहे. वर्षा सहलीत धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची (tourists) गर्दी या ठिकाणी वाढत आहे.     दहा ते बारा दिवसांत धबधबे सुरू या वर्षी पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यावर चांगलीच कृपा दर्शविली आहे. त्यामुळे बोरी धरण व बोरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे बोरी धरण 100 टक्के भरून धरणाचा सांडवा सुरू झाला. या सांडव्यामुळे बोरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि पर्यटकांच्या आवडीचे किल्ल्यातील नर-मादी दोन्ही धबधबे सुरू झाले आहेत.   हेही वाचा- शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई पर्यटकांची गर्दी नळदुर्ग येथील बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतरच किल्ल्यातील सर्व धबधबे वाहतात. धरणाच्या वरील होर्टी, गंधोरा, चिकुंद्रा या भागात मोठा पाऊस झाल्यामुळे बोरी धरण (कुरणूर प्रकल्प) पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे. यामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबे पाहण्यासाठी परिसरातील पर्यटक किल्ल्यात गर्दी करत आहेत. नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर 50 किमी. अंतरावर नळदुर्ग गाव लागते. Naldurg Fort गुगल मॅपवरून साभार किल्ल्यात तत्कालीन निजाम शासकाने बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधला. त्यावर दोन धबधबे बांधून नदीचे पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था केली. यावेळी जिल्ह्यात मोठा पाऊस होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी आणि शिलक धबधबे सुरू झाले आहेत. उस्मानाबाद, लातूरसह सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नळदुर्ग किल्ल्याला भेट देणारे अनेक पर्यटक आहेत. नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी धबधबा वाहताना पाहणे म्हणजे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून घेण्यासारखे आहे. अतिशय नेत्रदीपक व प्रेक्षणीय धबधबा म्हणून नर-मादी धबधब्याची ओळख आहे. या धबधब्यामुळे किल्ल्याचे सौंदर्य अधिकच वाढले आहे. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई नर मादी धबधबा कसा बनला नर-मादी धबधबा ही वास्तू बोरी नदीवर आहे. हा धबधबा जमिनीपासून 90 फूट उंचीवर आहे. इब्राहीम आदिलशहा (दुसरा) याच्या काळात मीर मुहम्मद इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने या वास्तूचा आराखडा तयार केला. त्यासाठी त्याने बोरी नदीचे पाणी वळवून एक बंधारा बांधला. यात पाणी महाल ही वास्तू 1613 मध्ये तयार केली. बंधाऱ्यावरून महालात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. पावसाळ्यात बोरी नदीचा जलस्तर वाढल्यावर धरणाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या सांडव्यातून पाणी वाहते. हे दोन कृत्रिम धबधबे ‘नर’ व ‘मादी’ या नावाने ओळखले जातात. नळदुर्ग व रणमंडळ किल्ले पाणी महालाने जोडलेले आहेत. सदर पाणी महाल हा कायम थंडगार असतो. या महालात एक फार्सी शिलालेख आहे. रणमंडळ किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गंडभेरुड व माशांची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत, अशी माहिती  इतिहास अभ्यासक जयराज खोचरे यांनी दिली.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: osmanabad
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात