अकोला, 28 जुलै : अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकातून (central bus stand akola) दररोज शेकडो प्रवासी येजा करतात. राज्यातील विविध ठिकाणी ग्रामीण भागात जाण्या-येण्या करीता या ठिकाणाहून एसटी उपलब्ध आहेत. नेहमीच प्रवाशांनी गजबजलेलं हे बस स्थानक आहे. मात्र, हे बस स्थानक सुविधांपासून दूर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बस स्थानकात खड्डे (Pothole) पडले असून सध्या हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. बस स्थानकात स्वच्छतेचा देखील अभाव आहे. येथील घाणीच्या साम्राज्याचा सामना प्रवाशांना करावा लागत असून यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे बस स्थानकात खड्डे पडले असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचत आहे. येथील खड्ड्यांचा त्रास बसचालकासह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर बसस्थानकावर मोठ्या प्रमाणातघाणीचे साम्राज्य असून येथील स्वच्छता होत नसल्याचे चित्र आहे. बसस्थानक परिसरातील भाजी बाजार, हाॅटेल, फुलांच्या दुकानातील टाकाऊ कचरा येथे टाकला जात असल्याने येथील नागरिक सांगतात. आता पावसाळ्यात या कऱ्यावर पावसाचे पाणी पडून कऱ्यातून दुर्धंत पसरली आहे. या दुर्गंधीमुळे प्रवाशांना बसस्थानकात बसण्याची इच्छा होत नाही.
हेही वाचा- एकेकाळी म्हशी राखणारा व्यक्ती सोशल मीडियातून करतोय लाखोंची कमाई, वाचा Success Story
पुन्हा कचरा टाकला जातो
बस स्थानक परिसरातील घाणी संदर्भात वारंवार महानगरपालिकेला सूचना दिल्या जातात. महानगरपालिकाच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी येथे येऊन स्वच्छता करतात. परंतु पुन्हा कचरा साचत आहे. अशी माहिती आगार क्रमांक 1 वरील वाहतूक निरीक्षक राखी खोटरे यांनी दिली.
हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत 'हे' गाव करतय लाखोंची कमाई, वाचा Special Report
उघड्यावरच लघु शंका
बसस्थानक परिसातील भाजीपाला विक्रेते, हाॅटेलचालक येते कचरा आणून टाकत आहेत. अनेक प्रवासी उघड्यावरच लघु शंका करताता. यामुळे यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आल्याचे बस स्थानक परिसरातील झेराॅक्स मालक गजानन दांडगे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Maharashtra News