मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बैलांच्या सुंदर मूर्ती असलेला ‘पोळा चौक’, इथला उत्सव असतो लय भारी VIDEO

बैलांच्या सुंदर मूर्ती असलेला ‘पोळा चौक’, इथला उत्सव असतो लय भारी VIDEO

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून अकोला शहरात पोळा चौक आहे. या चौकांमध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आजही ही परंपरा या ठिकाणी कायम आहे.

अकोला, 25 ऑगस्ट : शहरातील पोळा चौकात बैलांचे अनोखे पुतळे उभारण्यात आलेले आहेत. हा जुन्या शहरातील चौक असून येथील बैलांवरून चौकाचे नाव देखील पोळा चौक (Pola Chowk Akola) असेच  ठेवण्यात आले आहे. या चौकात दरवर्षी पोळा सण मोठ्या उत्साहास साजरी करण्यात येतो. या ठिकाणी उत्कृष्ट सजावटीच्या बैलांना पुरस्कार देखील देण्यात येतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून अकोला शहरात पोळा चौक आहे. या चौकांमध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आजही ही परंपरा या ठिकाणी कायम आहे. मागील 22 वर्षापासून येथील पोळा उत्सवाला थोडे वेगळे स्वरूप देण्यात आले आहे. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेकडून पोळ्याच्या दिवशी उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलांना पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. हेही वाचा- भेळ अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी; ‘अंबिका’ने जपली 39 वर्षांची परंपरा, पाहा Photos पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतकरी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात, बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात, पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवून बैलाचे आभार मानतात. यावर्षी मोठ्या उत्साहात होणार सण साजरा पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. शेतकरी वर्गात हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गेली दोन वर्ष करोना संकटामुळे मिरवणुका काढता आल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या घरी हा सण साजरा केला. मात्र, यावर्षी शेतकरी वर्ग हा मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करणार आहे. हेही वाचा- कपिला'च्या डोहाळ जेवणाची चर्चा तर होणारच, अनोखा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे पाहा Photos महाराष्ट्रात एकमेव पोळा चौक संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल मालगे सांगतात की, स्वातंत्र्य पूर्वीपासून या ठिकाणी पौळा चौक आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी आपल्या बैलबंड्या घेऊन यायचे. तेव्हापासूनच इथे पोळ्याची प्रथा सुरू झाली. हळूहळू पोळा हा सण मोठ्या उत्साहात इथे साजरा व्हायला लागला. त्यानंतर या चौकाची ओळख म्हणून चौकात बैल जोडी उभारण्यात आली. महाराष्ट्रात असा बैलांचा चौक क्वचितच असेल. Pola Chowk Akola गुगल मॅपवरून साभार चौक म्हटलं की, नेता, महापुरुषांचे पुतळे असतात. मात्र अकोल्यातील पोळा चौकात सुंदर अशी बैलजोडी उभारण्यात आली आहे. या चौकात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो, याठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान देखील केला जात असल्याचे  माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी सांगितले.  
First published:

Tags: Akola, Akola News

पुढील बातम्या