मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /टेरेस गार्डनमध्ये बहरले राष्ट्रीय फूल; छंदातून जोपासल्या 80 प्रजाती, VIDEO

टेरेस गार्डनमध्ये बहरले राष्ट्रीय फूल; छंदातून जोपासल्या 80 प्रजाती, VIDEO

X
अंगणातल्या

अंगणातल्या एखाद्या कोपर्‍यात कमळ खुललं असेल तर त्या अंगणाची, बाल्कनीची शोभा निश्चितच वाढते. त्यात टेरेस गार्डनमध्ये कमळाचं फूल असणं हे अप्रूप वाटण्यासारखी गोष्ट आहे.

अंगणातल्या एखाद्या कोपर्‍यात कमळ खुललं असेल तर त्या अंगणाची, बाल्कनीची शोभा निश्चितच वाढते. त्यात टेरेस गार्डनमध्ये कमळाचं फूल असणं हे अप्रूप वाटण्यासारखी गोष्ट आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India

    अकोला, 29 ऑगस्ट : कमळ (lotus) हे आपले राष्ट्रीय फूल आहे, पण ते आपल्याकडे फुलत नसल्याची आपली धारणा आहे. त्यामुळे कमळाचे फूल या माहिती पुढे आपण फार जात नाही. पण कमळ फुलाबद्दल माहिती जमवण्याच्या छंदातून अकोल्यातील एक डॉक्टरने चक्क टेरेसवर (Terrace Garden) कमळाची झाडे फुलवती आहेत. तेही एक दोन नव्हे तर तब्बल 80 प्रकारची. 

    बाल्कनीतल्या किंवा अंगणातल्या एखाद्या कोपर्‍यात कमळ खुललं असेल तर त्या अंगणाची, बाल्कनीची शोभा निश्चितच वाढते. त्यात टेरेस गार्डनमध्ये कमळाचं फूल असणं हे अप्रूप वाटण्यासारखी गोष्ट आहे. अकोला शहरातल्या गजानन पेठ मधील डॉक्टर स्मिता कोरडे यांनी घराच्या छतावर कमळाची बाग फुलवली आहे. या बागेत एक दोन नव्हे तर तब्बल 80 प्रकारांच्या कमळ आणि कुमुदिनीच्या प्रजाती आहेत. छतावरील विविध प्रकारच्या कमळांमुळे टेरेसचे सौंदर्य वाढत आहे.

    बाग कामाचा आधीपासूनच छंद

    शहरातील गजानन पेठे येथे राहणाऱ्या डॉ. स्मिता नीलेश कोरडे यांना बाग कामाचा आधीपासूनच छंद होता. त्यांची परसबाग नानाविध प्रकारची झाडे, कॅक्टस, फुलझाडे वेलींनी बहरलेली आहे. मात्र यात कमळ हे त्यांच्या आवडीचे फूल आहे. टेरेसवर कमळाची बाग कशी फुलवायची हा त्याच्यासमोर प्रश्नच होता. त्यांना कोरोना काळात हा छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला. कोरोना काळात याबाबतची अधिक माहिती गोळा केली. लागवड आणि संगोपनाचे ज्ञान घेतल्यावर त्यांनी कमळाचे कंद गोळा केले. काही प्रजाती दक्षिण भारतातून आणल्या. आणि टेरेसवर कमळ फुलविण्याची तयारी सुरू केली.

    टेरेस कमळाने फुलले

    प्लास्टिकच्या टपमध्ये त्यांनी कमळाचे कंद लावले. पाहता पाहता संपूर्ण टेरेस कमळाने फुलून गेले. कोरोना काळात सगळेच ठप्प झाले होते. मात्र, असं असतांना डॉ. स्मिता कोरडे यांच्याकडील कमळाची वाढ मात्र जोमात होती. सध्यस्थितीत तब्बल 80 प्रकारच्या प्रजाती त्यांच्या टेरेस गार्डनवर आहेत. गप्पी मासे, शेणखताच्या वापराने त्यांची कमळाची बाग दिवसेंदिवस समृद्ध होत आहे.

    हेही वाचा- Ganeshotsav 2022 : भक्तांसमोर ‘महागाईचे विघ्न'; बाप्पांच्या मूर्तीसह सजावट आणि प्रसादही 25 टक्क्यांनी महागला, VIDEO

    या आहेत प्रजाती

    सहस्र कमळ, पिक क्लाऊड व्हाईट पिओनी, रेड पिओनी तियांगली, रेड ब्लड, अभावरी पिओनी, व्होनविसा अशा अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत. कुमुदिनीमध्ये सुद्धा अनेक प्रजाती असून, त्यामध्ये रंग बदलणारी प्रजातीही टेरेस गार्डनवर फुलल्या आहेत.

    हेही वाचा- इथं मिळतात 131 प्रकाराचे पान; Gold च्या किमतीमध्ये होईल वर्षभराचा खर्च, VIDEO

    बागेमुळे मधमाशांचेही संगोपन 

    अकोल्याच्या वातावरणात कमळ हे जगू शकतं का हा सर्वात मोठा प्रश्न होता, मात्र, त्यांनी 80 प्रकारच्या कमळ आणि कुमुदिनी प्रकारच्या प्रजाती फुलवू शकतात हे सिद्ध केलं. याचा सर्वाधिक आनंद कोरडे यांना झाला असून या कमळाच्या बागेमुळे मधमाशांचेही संगोपन होते, त्यामुळे परागीभवन होऊन निसर्गचक्र वृद्धिंगत होते, आणि कमळ फुलल्यावर होणारा आनंद हा अधिक होत असल्याचं डॉ.स्मिता कोरडे आवर्जून सांगतात.

    First published:
    top videos

      Tags: Akola, Akola News