अकोला, 26 ऑगस्ट : आपल्या देशात विड्याच्या पानाचे (Paan) शौकीन खूप आहेत. अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भ या पान खाण्याशी जोडलेले आहेत. पानावर आधारित चित्रपटातील गाने देखील तयार झालेली आहेत. पान खाण्याचा शौक असलेली दर्दी मंडळी नित्यनेमाने एखाद्या दुकानात जाऊन पानाचा आस्वाद घेत असतात. अकोल्यात पान शौकिनांसाठी मस्त बनारसी पान (Mast banarasi paan) सेंटरमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 131 प्रकारचे पान बनतात. इतकी प्रचंड व्हरायटी असणारे बहुधा अकोल्यातील हे एकमेव पान सेंटर असावे.
पान प्रेमी सर्वत्र आढळतील. एके काळी नवाबांची शान असलेला पानाचा विडा हा स्वीट माऊथ फ्रेशनर काळानुरूप अनेक प्रकारांमध्ये दाखल झाला आहे. अनेकांना सवयीप्रमाणे जेवणे झालं की पान पाहिजेच असते तर काही जर आवडीने कधीही पान खातात. त्यामुळे पानांचे विविध प्रकार आणि व्हरायटी समोर येत आहेत. पानांचे बनारसी, मघई, कलकत्ता, मीठा, बगैर सुपारी, साधा, मसाला, गुलकंद असे अनेक प्रकार मिळतात.
हेही वाचा- भेळ अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी; ‘अंबिका’ने जपली 39 वर्षांची परंपरा, पाहा Photos
पानाची लज्जत
आजकाल पानांमध्येही चॉकलेट, बटरस्कॉच, सुकामेवा असे अनेक प्रकार नव्याने मिळू लागले आहेत. पानाची भव्य दुकाने देखील थाटली जात आहेत. अकोल्यात देखील असेच भव्य मस्त बनारसी पान स्टॉल उभारले आहे जिथे तब्बल 131 प्रकारची पाने मिळतात. इतक्या व्हरायटी उपलब्ध असल्याने शौकीन एकावेळी एकापेक्षा अधिक पाने खातात. इतकी लज्जत त्यात असते.
कोणत्या पानांना पसंती
जास्त पसंती मिळणाऱ्या पानात स्मोकींग पान, फायर पान, चॉकलेट फ्लेवर, मावा पान, ड्रायफ्रूट पान, ओरिओ पान, रोल पान, बनारसी थाली पान, तर पान ड्रिंक्समध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे पान शॉर्ट आणि दुसरा म्हणजे पान शेक. या पानांना शौकिनांची अधिक पसंती आहे. अकोल्यात वेगवेगळ्या पानांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा- कपिला'च्या डोहाळ जेवणाची चर्चा तर होणारच, अनोखा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे पाहा Photos
गुगल मॅपवरून साभार
गोल्ड पान
शौकीन त्यांच्या आवडीनुसार पान घेतात. इथे 30 रुपयापासून ते 2100 रुपयांपर्यंत पानांच्या किमती आहेत. वर्षभर साधं पान खाल्लं तर 2100 बिल येईल. एवढ महाग गोल्ड पान, गोल्ड ड्रायफ्रूट पान आहे हे पान ऑर्डर्सप्रमाणे बनवले जातात असे अब्दुल समद यांनी सांगितले. तुम्हाला जर या मस्त बनारसी पान सेंटरला भेट द्यायची असेल तर अकोला शहरातील कार्मेल शाळेच्या बाजूला हे पान सेंटर आहे. (संपर्क क्रमांक- 7776086192)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News