मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Ganeshotsav 2022 : भक्तांसमोर ‘महागाईचे विघ्न'; बाप्पांच्या मूर्तीसह सजावट आणि प्रसादही 25 टक्क्यांनी महागला, VIDEO

Ganeshotsav 2022 : भक्तांसमोर ‘महागाईचे विघ्न'; बाप्पांच्या मूर्तीसह सजावट आणि प्रसादही 25 टक्क्यांनी महागला, VIDEO

यंदा वाढलेल्या किंमतीमळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत. गणेश मूर्तीपासून ते सर्व पूजा साहित्य आणि प्रसाद महागात मिळत आहे.

बीड, 29 ऑगस्ट : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण यंदा वाढलेल्या किंमतीमळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत. गणेश मूर्तीपासून ते सर्व पूजा साहित्य आणि प्रसाद देखील (Worship Materials) यंदा महागात मिळणार आहे. जवळपास 25 टक्क्यांनी महागाई वाढली असून गणेशोत्सवात ‘महागाईचे विघ्न भक्तांच्या समोर उभे ठाकले आहे. यावर्षी गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट नसले तरी नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाला नव्हता. मात्र, यावर्षी मोठ्या उत्साहात गणरायांचे आगमन होणार आहे. अवघ्या काही दिवसावर गणेशोत्सव असल्याने तयारीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी वाढली आहे. परंतु, यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती पासून ते प्रसाद, सजावट व पूजेच्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. मूर्तीमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ यावर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. यातच बाप्पांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादांमध्ये प्रति किलो 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे तर सजावटीच्या साहित्यात 10 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अडीच फुटांची गणपती मूर्ती अडीच ते तीन हजारापर्यंत विक्री व्हायची आता त्याच मूर्तीची किंमत साडेतीन ते चार हजार पर्यंत गेली आहे. 200 ते 250 रुपयापर्यंत विक्री होणारे घरगुती गणेशमूर्ती यंदा तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत मिळत आहे. मजुरी 700 रुपयांपर्यंत पोहोचली रंगाचे दर 30 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या वर्षी वीस लीटर रंगाची बकेट 4400 पर्यंत होती तर यंदा तीच बकेट 7600 रुपयांपर्यंत गेली आहे. सोनेरी रंग 1700 ते 1800 रुपये किलो होता यावर्षी तोच रंग 2500 रुपये झाला आहे. गेल्या वर्षी मजुरी 400 ते 500 रुपये होती ती आता 700 रुपये पर्यंत पोहोचली आहे. याचाच एकूण परिणाम मूर्तीच्या किमतीवर पडला असून किमतीमध्ये वाढ झाली आहे. हेही वाचा- भेळ अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी; ‘अंबिका’ने जपली 39 वर्षांची परंपरा, पाहा Photos पूजेच्या साहित्याचा संच महागला मागील वर्षी 20 ते 30 रुपयांपर्यंत विक्री होणाऱ्या कृत्रिम फुलांच्या माळा यंदा मात्र 40 ते 50 रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत. तर पूजा साहित्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. मागील वर्षी 400 रुपयाला विकला जाणारा पूजेच्या साहित्याचा संच यावर्षी 600 रुपयाला विक्री केला जात आहे. प्रसादांच्या किमतीमध्ये देखील किलोमागे 20 ते 30 रुपयाने वाढ झालेली आहे.  हेही वाचा- कपिला'च्या डोहाळ जेवणाची चर्चा तर होणारच, अनोखा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे पाहा Photos मागील वर्षी कोरोनामुळे मोठ्या गणपती मूर्तीची मागणी कमी होती त्यामुळे भावही कमी होते. यंदा मागणी वाढली असून महागाईनं मूर्तीच्या किमतीही वाढल्या असल्याचे गणपती मूर्ती व्यापारी ऋषिकेश फुंदे यांनी सांगितले. प्रत्येक वस्तूत महागाई वाढली गणपती मूर्ती आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात आलो आहे. यावेळी बाजारात सर्वच वस्तूंची महागाई दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक वस्तूत महागाई वाढलेली आहे. गेल्या वर्षी अडीचशे ते तीनशे रुपयाला खरेदी केलेली मूर्ती यंदा चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचे ग्राहक, योगेश भागवत यांनी सांगितले.
First published:

Tags: Beed, Beed news, Food, Ganesh chaturthi, Home-decor

पुढील बातम्या