अकोला, 8 सप्टेंबर : यंदा लाडक्या गणेशाचं थाटामाटात आगमन झालं आहे. तब्बल दोन वर्षांच्या कोरोना (Corona) निर्बंधानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. जिल्ह्यातील गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. विविध गणेश मंडळांनी तसेच घरोघरीसुद्धा वेगवेगळे देखावे साकारले असून आकर्षक देखावे पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. (Ganesha festival 2022) अकोला शहरातील गौरक्षण रोडवरील सहकार नगरातील मनोहर कोठारी यांच्या निवासस्थानी यंदा गणेशोत्सवात गोकूळ श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती स्थापना केली आहे. तसेच गणपतीसमोर आकर्षक देखावा साकारला असून यात राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. विशेष म्हणजे या देखाव्यासाठी वाळू आणि बाहुल्या त्यांनी चक्क राजस्थानवरून आणल्या आहेत. हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO राजस्थानी वस्त्र आणि वाळूचा उपयोग राजस्थानी देखावा महेश कोठारी, आणि त्यांच्या पत्नी शीतल यांनी तयार केला आहे. या देखाव्यातून राजस्थानी कला, संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. राजस्थानी वस्त्र आणि वाळूचा उपयोग सजावटीसाठी केला आहे. या देखाव्यात उंट देखील दाखवण्यात आला आहेत. राजस्थानी कला पाहण्याची संधी देखाव्याद्वारे मिळत आहे. पूर्ण देखावा हाताने तयार केला असून त्यात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO राजस्थानी संस्कृती कोठारी कुटुंब गणपतीसमोर नेहमीच नवनवीन आकर्षक देखावे साकारत असतात. कोठारी हे मागच्या महिन्यामध्ये राजस्थान फिरायला गेले. तेथून त्यांनी राजस्थानी वाळू, बाहुल्या, उंट आणले. त्या साहित्यापासून त्यांनी यावेळी देखावा साकारला आहे. कोठारी हे दरवर्षीच वेगवेगळे देखावे गणपती समोर करत असतात. मात्र यावर्षी काय करायचं असा प्रश्न होता. यावेळी त्यांनी आणलेल्या साहित्याची आठवण झाली. मग त्यापासूनच देखावा साकारला. देखाव्यातून अकोल्यातील नागरिकांना राजस्थानी संस्कृती पाहायला मिळत आहे. परिसरातील नागरिक मोठ्या कुतूहलाने हा आकर्षक देखावा पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.