जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha : खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ

Wardha : खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ

Wardha : खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ

गौरी, गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वे, एसटी बसचे आरक्षण फूल झाले आहे. तर काही ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नाहीत.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

    वर्धा: 2 सप्टेंबर : गौरी, गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्स (Travels) व्यवसायिक घेताना  दिसत आहेत. काही दूरच्या पल्ल्यासाठी बससेवा नाही तर रेल्वेचे टिकीट ऐनवेळी मिळत नसल्याने चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी आता आपला मोर्चा ट्रॅव्हल्सकडे वळवला आहे. या संधीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स व्यावसायकांनी मनमानी भाव आकारायला सुरूवात केली असून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. गौरी, गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वे, एसटी बसचे आरक्षण फूल झाले आहे. तर काही ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने परिणामी आता ऐन वेळी नागरिकांनी खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडला आहे. मात्र, या खासगी ट्रॅव्हल्सकडून  मनमानी भाडेवसुली केली जात आहे. एसटीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरक्षित समजला जातो. मात्र, तरीदेखील प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देतो. ट्रॅव्हल्सचे तिकीट एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट जास्त असूनही याकडे कुणाचे लक्ष नाही. त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून नागरिकांची एकप्रकारे लूट सुरू असल्याचे चित्र आहे. बस-ट्रॅव्हल्सला या मार्गावर गर्दी  बस-ट्रॅव्हल्सला नागपूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद तसेच पुणे आणि मुंबई या मार्गावर प्रवाशांची जास्त प्रमाणात गर्दी असते. वर्धा बसस्थानकावरून पुणे आणि मुंबईसाठी एसटी बस जात नसल्याने परिणामी प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. एसटीचा प्रवास सुरक्षित एसटी बसचा प्रवास सुरक्षित असल्याने अनेकजण छोट्या अंतरावर जाण्यासाठी एसटी बसलाच पसंती देतात. मात्र, लांब पल्ल्याच्या अंतरासाठी मात्र जादा पैसे मोजून ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असल्याचे दिसते. ट्रॅव्हल्सचे भाडे जास्त का? प्रवासी संख्या रोडावली आहे. त्यामुळे डिझेलचाही खर्च निघत नाही. त्यातच गाडीवर असलेल्या चालक वाहकाचाही पगार निघत नाही. अनेकदा रिकाम्या गाड्या जातात. म्हणून भाडेवाढ करावी लागते. पेट्रोल, डिझेलचे भाव परवडत नाही. त्यातही कंपनीकडून नेहमीच दर कमी जास्त केले जाते. प्रवासी देखील तेवढे मिळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांकडून जादाचे भाडे आकारावे लागत असल्याचे राज ट्रॅव्हल्स वर्धा येथील कुणाला चिमुरक यांनी सांगितले. दीडपट तिकीट जास्त वर्धा ते नागपूर एसटी बससाठी 115 तर खासगी बससाठी 100 रुपये, औरंगाबादसाठी एसटी बस 695 रुपये आकारते तर खासगी बस 1050 रुपये आकारते. यवतमाळसाठी एसटी बस 105 रुपये आकारते तर ट्रॅव्हल्स 210 रुपये आकारते, अमरावतीसाठी बस 190 तर ट्रॅव्हल्स 300 रुपये आकारते. ट्रॅव्हल्स चालकावर बंधन नाही का ? ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून दररोज दरात चढ-उतार केला जातो. आज जर 800 रुपये तिकीट असेल तर दुसऱ्या दिवशी 1000 रुपये केले जाते. त्यामुळे अशा ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कुणाचेही बंधन नाही, असे एकंदरीत चित्र आहे. पैसे जास्त देण्याशिवाय पर्याय काय? वर्ध्यातून पुण्यासाठी एसटीच सुटत नाही. त्यामुळे आम्हाला जादा पैसे देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो आहे. रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट वेटिंगवर असल्याने जादा पैसे देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. मात्र, या दरवाढीवर कुणाचेच नियंत्रण नाही, ही शोकांतिका असल्याचे प्रवाशी अशरफ अन्सारी यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात