मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO

Beed : यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO

भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती, म्हणून येथील गणेशाला अशापूरक नावाने ओळखले जाते. याच ठिकाणी यमराजाला गणेशाने शापमुक्त केले.

बीड, 30 ऑगस्ट : जिल्ह्यातील नामलगाव येथे श्री आशापूरक गणपतीचे मंदिर (Ashapurak Ganpati Mandir) आहे. नामलगाव येथील हे स्थान प्रसिद्ध गणेश क्षेत्र मानले जाते. याच ठिकाणी यमराजाला गणेशाने शापमुक्त केले. नदीच्या त्रिवेणी संगमावर यमाने आशापूरक गणेशाची स्थापना केली, अशी आख्यायिका सांगितली जाते. भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती, म्हणून येथील गणेशाला अशापूरक नावाने ओळखले जाते. बीड शहरापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर नामलगाव येथे श्री आशापूरक गणेशाचे मंदिर आहे. या मंदिराला शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. शापामुळे यमाचे अंग दुर्गंधीयुक्त झाले होते. तेव्हा यमाच्या स्वप्नात जाऊन गणपतीने साक्षात्कार दिला. गणपतीने यमाला सांगितले, नारदा, बिंदुसरा, करपरा त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान कर. या साक्षात्कारानंतर यमाने नामलगाव येथे येऊन स्नान केले. दक्षिण दिशेला यमराज उभा राहिला तेव्हा गणेशाची मूर्ती समोरून जमिनीतून प्रकट झाली. आता माझी आशा पूर्ण झाली. अशापूरकर म्हणून तू ओळखला जाशील, असे यमाने गणेशाला म्हटले. आशापुरकाचा आशीर्वाद घेतल्यानंतर यम हा दक्षिणी दिशेचा राजा झाला. गणेश भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा अशी या गणपतीची त्यावेळेस पासूनची ख्याती आहे, अशी माहिती पुजारी प्रमोद कुलकर्णी- 9881826033 यांनी दिली. गणपतीचा विवाह... अशापुरकर गणपतीच्या विवाहाला तब्बल 305 वर्षाची परंपरा असल्याचे सांगितले जाते. मागील सहा पिढ्यांपासून ही परंपरा जपली गेली आहे. भारत देशातील एकमेव गणपती आहे ज्यांचा विवाह सोहळा केला जातो. गणेश भक्त निरंजन स्वामी यांनी ही परंपरा सुरू केली. नामल गावच्या गणपतीच्या लग्नात प्रत्येक वर्षी गावच्या माहेरवाशिणी येतात. रिद्धी आणि सिद्धीला पालखीत ठेवून गणेश मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर गणपती बाप्पाच्या शुभमंगल रिद्धी आणि सिद्धी बरोबर होतो. गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच हा विवाह सोहळा येथे रमतो. परराज्यातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. तीन नद्यांचा संगम नामलगाव हे अमलाश्रम गणेश स्थान असून नारदा, बिंदुसरा, करपरा या तीन नद्यांच्या संगम येथे झाला आहे. यात नारदा नदीचे रूप लुप्त अवस्थेत आहे असे मानले जाते. यास प्रयाग तीर्थ असेही समजतात. हे स्थान इ.स.13 व्या शतकापासून प्रसिद्ध आहे. हेही वाचा-  Ganpati Aarti 2022: यंदा न चुकता म्हणा बाप्पाची आरती! व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा हे खास स्टेटस मंदिराची दिनचर्या  सकाळी पाच वाजता मंदिर भाविक भक्तांसाठी खुली केले जाते. सकाळी 5:30 सुमारास आरती होते. नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर स्तोत्र पाठ व अभिषेक केला जातो. संध्याकाळी नऊ वाजता भक्तांसाठी मंदिर बंद केले जाते. हेही वाचा- Ganeshotsav 2022 : भक्तांसमोर ‘महागाईचे विघ्न'; बाप्पांच्या मूर्तीसह सजावट आणि प्रसादही 25 टक्क्यांनी महागला, VIDEO मंदिराचा पत्ता बीडहून गेवराईकडे जाताना येडशी औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोसापुरी शिवारात उड्डाणपुलाच्या खालून सात किलोमीटर अंतरावर उजवीकडे नामलगावचे अशापूरक मंदिर आहे. Ashapurak Ganpati Mandir गुगल मॅपवरून साभार वर्षभरातील उत्सव चित्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नामलगाव येथील अशापुरकर गणपतीच्या मूर्तीस अभिषेक पूजा केली जाते. तिसऱ्या श्रावण सोमवारी गणपतीची पूजा करण्यात येते. भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थी पासून गणेशोत्सवाच्या काळात रोज सकाळी व सायंकाळी गणपतीची आरती केली जाते. शुद्ध चतुर्थी म्हणजेच अनंत चतुर्दशीला सद्गुरू निरंजन स्वामी कराडकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. माघ महिन्यातील उत्सव हा या क्षेत्रातील वार्षिक उत्सव असतो. माघ शुद्ध प्रतिपदेपासून या उत्सवाला यात्रेला सुरुवात होते.
First published:

Tags: Beed, Beed news, Culture and tradition, Temple, मंदिर

पुढील बातम्या