मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात अजितदादांनी लावला कामाचा धडाका, काँग्रेसने घातला खोडा!

पुण्यात अजितदादांनी लावला कामाचा धडाका, काँग्रेसने घातला खोडा!


खरंतर पुणे पालिकेत सत्ता आहे ती भाजपची आणि बहुचर्चित एचसीएमटीआर प्रकल्पावरून आमनेसामने आलेत ते काँग्रेस-राष्ट्रवादी.

खरंतर पुणे पालिकेत सत्ता आहे ती भाजपची आणि बहुचर्चित एचसीएमटीआर प्रकल्पावरून आमनेसामने आलेत ते काँग्रेस-राष्ट्रवादी.

खरंतर पुणे पालिकेत सत्ता आहे ती भाजपची आणि बहुचर्चित एचसीएमटीआर प्रकल्पावरून आमनेसामने आलेत ते काँग्रेस-राष्ट्रवादी.

  • Published by:  sachin Salve
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 20 जानेवारी :  पुण्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्र हाती घेताच अजित पवारांनी आपल्या स्टाईलने विकासकामांमध्ये बदल सुचवून कामाचा धडाका सुरू केलाय खरा पण त्याला पहिला खो हा काँग्रेसनेच घातला. पुण्यातील बहुप्रतिक्षित एसचीएमटीआर अर्थात एलेव्हेटेड वर्तुळाकार रोडची रुंदी कमी करून त्यावरून फक्त निओ मेट्रो नेण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मांडला आहे. अजित पवारांनीही त्याला अनुकूलता दर्शवली आहे. पण पुणे काँग्रेसचे स्थानिक नेते अभय छाजेड यांनी मात्र, एचसीएमटीआर प्रकल्प रस्त्याची रुंदी कमी करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. पुणे डीपीतील 87सालचा प्रस्तावित एचसीएमटीआर रस्ता प्रकल्प पुन्हा वादात सापडला आहे. आधीच पर्यावरणवाद्यांचा विरोध त्यात वाढीव खर्चाचे टेंडर. त्यामुळे पुणे मनपा प्रशासन हा कालबाह्य एलेव्हेटेड वर्तुळाकार रस्ताच रद्द करण्याच्या मानसिकेत आहे. नुकतंच त्याचं टेंडरही रद्द झाल्याने पालिका आयुक्तांनी आता त्याजागी एलेव्हेटेड निओ मेट्रोचा प्रस्ताव ठेवला आहे. 17 तारखेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवारांनी देखील या प्रस्तावित बदलास अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे या 24 फुटी एचसीएमटीआर रस्ता प्रकल्पाऐवजी त्याच मार्गावरून आता फक्त 8 फुटी एलेव्हेटेड निओ मेट्रोचा प्रस्ताव नव्याने सादर झाला आहे. पुणे मनपातील सत्ताधारी भाजपची मान्यता घेऊन हा प्रकल्प पुढे नेणार असल्याचंही अजित पवार म्हणाले आहे. पुणे मनपातील काँग्रेसचे स्थानिक नेते अभय छाजेड यांनी मात्र, एचसीएमटीआर प्रकल्प रद्द करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पासाठी 60 टक्के भूसंपादन पूर्ण झालं असून पुणेकरांची वाढीव रस्त्यांची गरज लक्षात घेता हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका छाजेड यांनी मांडली आहे. खरंतर पुणे पालिकेत सत्ता आहे ती भाजपची आणि बहुचर्चित एचसीएमटीआर प्रकल्पावरून आमनेसामने आलेत ते काँग्रेस-राष्ट्रवादी. त्यामुळे या वादात भाजपचे महापौर नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहावं लागणार आहे. म्हणूनच काँग्रेसने मध्यममार्ग म्हणून निओ मेट्रोसोबतच एलेव्हेटेड रस्त्याचाही देखील प्रस्ताव लावून धरला आहे. पाहुयात या वादात नेमकं बाजी मारतंय ते...
First published:

Tags: Ajit pawar, Congress, Pune

पुढील बातम्या