मुंबई, 17 सप्टेंबर : शिंदे सरकार हे स्थगिती सरकार आहे. व्हाईट बुकमध्ये मंजूर झालेल्या कामांना आतापर्यंत कधीच स्थगिती दिली नव्हती.असं म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले कि सरकार येत असतात जात असतात आतापर्यंत कधी तसं घडलं नव्हतं. आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत आम्ही पण चुकीचे आरोप करण्यात अर्थ नाही त्यांनी पण थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून देण्यात अर्थ नसल्याचे म्हणत अजित पवार यांनी टीका केली.
भाषण सुरू असताना अजित दादानी जाहीर भाषांत चूक मान्य केली. दरम्यान लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहून काय झाल असे पवार विचारताच त्यांना त्यांच्या चूक लक्षात आली. एका साखर कारखान्याचे नाव घेताना जय जवान जय किसान असे नाव घेतल्याने सभेत लोक हासले. यावर पवार म्हणाले तर काय झाल म्हणून विचारलं तेव्हा जय भवाणी साखर कारखाना नावं आहे. असं सांगितल्यावर अजीत दादा यांनी चालू भाषणात माझी चूक झाली अस म्हणत लातूरमधील कारखान्याच नावं तोंडात आले असे म्हणाले. यानंतर ते बोलताना एकच हशा पिकला.
अजित दादांनी जाहीर भाषणात 'ती' चूक मान्य केली, नेमकं काय झालं पाहा pic.twitter.com/z1SrlYKviL
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
हे ही वाचा : ‘त्यांच्याबद्दल बोलताना जरा औकातीत…’; त्या वक्तव्यामुळे अंबादास दानवेंवर भडकले आशिष शेलार
प्रकल्प आले पाहिजेत वेदांता प्रकल्प इथे उभा राहिला पाहिजे आणि त्याच्या करता जे काय त्यांना पणाला लावायचा असेल ताकत लावायचा असेल कोणाला भेटायचं असेल त्यांनी भेटावं आणि तो प्रकल्प आणावा इथल्या तरुणांना रोजगार मिळवून द्यावा असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री होऊन तीन महिने झाले ज्यावेळेस वेदांता संदर्भात कळलं तेव्हा पासून 90 दिवस झाले काही प्रयत्न केले नाहीत. स्वतः प्रयत्न करायचा नाही टीका करायची.
हे ही वाचा : अब्दुल सत्तार म्हणतात राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे अजित दादांनाच माहीत
वास्तविक दोघजण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता ते तर म्हणत होते आम्ही दोघे खंबीर आहेत मग काय झालं असा उपरोधिक टोला लगावला. वेदांता सारखे दुसरे राज्याच्या हिताचे प्रकल्प असतील पर्यावरणाला कुठलाही त्रास होणार नसतील सगळ्या अशा प्रकल्पांना आमची संमती आहे मी विरोधी पक्ष नेता या नात्याने सहकार्य करायला तयार असल्याचे ते म्हणाले.