मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Abdul Sattar : अब्दुल सत्तार म्हणतात राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे अजित दादांनाच माहीत

Abdul Sattar : अब्दुल सत्तार म्हणतात राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे अजित दादांनाच माहीत

अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार अब्दूल सत्तार यांनी शिवसेनेला पाठींबा महाविकास आघाडी काळात देत मंत्रीपद मिळवले. (Abdul Sattar)

अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार अब्दूल सत्तार यांनी शिवसेनेला पाठींबा महाविकास आघाडी काळात देत मंत्रीपद मिळवले. (Abdul Sattar)

अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार अब्दूल सत्तार यांनी शिवसेनेला पाठींबा महाविकास आघाडी काळात देत मंत्रीपद मिळवले. (Abdul Sattar)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalna, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

जालना, 17 सप्टेंबर : अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार अब्दूल सत्तार यांनी शिवसेनेला पाठींबा महाविकास आघाडी काळात देत मंत्रीपद मिळवले. (Abdul Sattar) यानंतर त्यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातही कृषी मंत्री पद मिळवले. दरम्यान मागच्या महिन्यात त्यांच्यावर काही आरोप करण्यात यावरून ते जोरदार चर्चेत आले होते. दरम्यान सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी काळात तिजोरीत पैस नसल्याचे पवार म्हणायचे तिजोरीत पैसा नाही हे फक्त दादांनाच माहिती असल्याचा टोमणा सत्तार यांनी मारला आहे.

हे ही वाचा : VIDEO: 'पोलीस भरती झालीच पाहिजे!' फडणवीसांसमोरच तरुणांचा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

अब्दुल सत्तार हे जालन्यात पत्रकारांशी चर्चा करत होते यावेळी त्यांनी अजीत पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले कि, त्यावेळी राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे तर अजित दादांनाच माहित आहे. राज्याची तिजोरीत खडखडाट नसून ती सर्वांसाठी भरलेली आहे असं सत्तार यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले असून त्यांच्या खात्यावर 3 हजार 500 कोटी रुपयांची मदतही पोहोचली असल्याची माहिती सत्तार यांनी दिलीये. दरम्यान ऑनलाईन ई पीक पाहणीत बदल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचंही सत्तार यांनी म्हंटलं.

गुलाबराव पाटलांचीही अजित पवारांवर टीका

शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मागच्या दोन महिन्यांपासून बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहे. (Gulabrao Patil vs Ajit Pawar) दरम्यान एकेकाळी शिवसेनेचे कट्टर असलेले गुलाबराव पाटील यांच्यावर काल (दि.17) विरोधी पक्षनेते अजीत पवारांनी चांगलीच टीकेची झोड उठवली. दरम्यान यावर गुलाबराव पाटील यांनीही पलटवार केला आहे. जळगावमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे.

हे ही वाचा : उद्योगासाठी ठाकरे सरकारने वाटप केलेल्या भुखंडाना मुख्यमंत्री शिंदेकडून स्थगिती, हजारो कोटींची गुंतवणूक ठप्प

यावर गुलाबराव पाटील म्हणाले कि, अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. 

मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. पण अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहे, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती.

First published:

Tags: Ajit pawar, Cm eknath shinde, Maharashtra government, Rebel Abdul Sattar expelled from Congress, Shiv Sena (Political Party)