मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ajit Pawar : अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी सहकार्य करतो पण…

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी सहकार्य करतो पण…

मागच्या चार दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात येणार असल्याचे समजताच राज्यातील राजकारणाला नवे वळण आले. (Ajit Pawar)

मागच्या चार दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात येणार असल्याचे समजताच राज्यातील राजकारणाला नवे वळण आले. (Ajit Pawar)

मागच्या चार दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात येणार असल्याचे समजताच राज्यातील राजकारणाला नवे वळण आले. (Ajit Pawar)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 ऑगस्ट : मागच्या चार दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात येणार असल्याचे समजताच राज्यातील राजकारणाला नवे वळण आले. (Ajit Pawar) सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले कि, तीन महिने झाले यांना मुख्यमंत्री होऊन. कंपनीचे ट्वीट आल्यानंतर यांना आपल्या राज्यातून प्रकल्प जात असल्याचे समजले. आज 90 दिवस होत आले त्यांना काहीच माहिती नाही हे कितपत योग्य आहे.  स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठे प्रकल्प वगैरे याबात प्रयत्न करायला हवे होते, त्यांनी काय केलं असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

हे ही वाचा : 'त्यांच्याबद्दल बोलताना जरा औकातीत...'; त्या वक्तव्यामुळे अंबादास दानवेंवर भडकले आशिष शेलार

यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली. ते तर म्हणत होते की आम्ही दोघं खंबीर आहोत. अजूनही पालकमंत्री नेमलेले नाहीत. ते काय सांगतायत? तीन तीन महिने तुम्हाला पालकमंत्री नेमता येत नाहीत. इतकी कामं, इतक्या कमिट्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. खूप गोष्टी असतात.

त्यावर काही करत नाहीत आणि आम्ही काही बोललो की हे असंच बोलतात वगैरे सांगतात. आम्ही वस्तुस्थितीला धरून बोलतो. यावरून लक्ष बाजूला जाण्यासाठी तिसरंच काहीतरी काढतात, असेही पवार म्हणाले. 

हे ही वाचा : आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे पण… गुलाबराव पाटलांची कबुली

दरम्यान, राज्याच्या हिताचे प्रकल्प आणल्यास आम्ही सरकारला सहकार्य करू, असे अजित पवार यावेळी म्हणाले. अजूनही त्यांनी हा प्रकल्प राज्यात आणावा, दुसरेही प्रकल्प आणावेत. राज्याच्या हिताचे, पर्यावरणाला धक्का न पोहोचवणारे प्रकल्प त्यांनी आणावेत. त्यासाठी आमची संमती आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे, असं अजित पवार म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Cm eknath shinde, Devendra Fadnavis, NCP