मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''नितीन गडकरी यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही तपासावे लागेल'', अजित पवारांची गडकरींच्या पत्रावर पहिली प्रतिक्रिया

''नितीन गडकरी यांच्या आरोपात तथ्य आहे की नाही तपासावे लागेल'', अजित पवारांची गडकरींच्या पत्रावर पहिली प्रतिक्रिया

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यातील कामांमध्ये शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते आणि पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे (Uddhav Thackeray) पत्राद्वारे केली. त्यानंतर या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
पुणे, 15 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांना पत्र (Letter)) लिहून वाशिम (Washim) जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे (Shivsena) स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे (Road Work) रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Cm Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल असल्याचे सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून मी समाजकारणात काम करतोय, त्यामुळे मी नेहमी सांगतो की हा पैसा जनतेचा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे, होणाऱ्या कामाचा दर्जा राखला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर एखादा ठेकेदार चांगले काम करत असतानाही काही जण एखाद्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन, मिळालेल्या पदाचा आधार घेऊन जर त्रास देत असेल तर तो ही त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. या संदर्भातील पत्र आता थेट मुख्यमंत्र्यांनाच गेले आहे. गेल्या पावणेदोन वर्षांपासून मी मुख्यमंत्र्यांसोबत काम करतोय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी त्यांचा नेहमी कटाक्ष असतो असतो. अधिकाऱ्यांची बैठक जमा होते तेव्हाही पर्यायावर कामाचा दर्जा आणि वृक्षतोड कसे टाळता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ते बारकाईने लक्ष घालतील त्याची शहानिशा करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे, असं अजित पवार म्हणालेत. मात्र कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करता कामा नये, असंही ते म्हणालेत. Watch Video: मुख्यमंत्री भाषण संपवून बाहेर पडताच मंत्रालयासमोर घडली मोठी घटना उपमुख्यमंत्र्यांकडून जनतेला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. LPG वर तुम्हाला सबसिडी मिळते आहे की नाही? त्वरित करा चेक, अशी आहे प्रोसेस अजित पवार म्हणाले, बघता बघता 75 वर्षे झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक पिढ्यांचा योगदान आहे. आजवर देशाने प्रगती करण्याचा खूप प्रयत्न केला आहे. मात्र देशासमोर अजूनही काही प्रश्न आहेत. दररोज नवनवीन प्रश्न निर्माण होत असतात. मात्र ते उगाळत बसण्याचा आजचा दिवस नाहीतर आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. देश एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले आहे त्या संविधानाचा आदर करून त्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधींपासून ते अनेकांनी कशाचीही पर्वा न करता योगदान दिले आहे. अशाच वीरांचे स्मरण करून त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Ajit pawar, NCP, Nitin gadkari, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या