मुंबई, 15 मार्च : महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईतल्या वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीनंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी जाहीर सभा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. महाविकास आघाडीनं राज्य सरकार, केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची रणनीती तयार केलीय. यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्यात. महाविकासआघाडीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी भर बैठकीत कार्यकर्त्यांना खुली ऑफरच दिली आहे. प्रत्येक शहराची जबाबदारी त्या ठिकाणच्या मोठ्या नेत्यावर देण्यात आलीय. जो चांगलं नियोजन करेल त्याला बक्षिस देण्यात येईल, असंही यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. ‘मी घरी बसून…’ टीकेवर उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचा प्रसार सर्वदूर व्हायला पाहिजे. यासाठी प्रत्येक शहरातील सभा जोरदार होण्यासाठी नियोजन करा असे आदेश अजित पवारांनी दिले. ज्याची मोठी सभा त्याला बक्षिस देण्यात येईल, बक्षिस काय असेल हे नंतर सांगतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. अजित पवारांची ऑफर काय? ‘जागा प्रचंड मोठी असली पाहिजे, सभा ओसंडून वाहिली पाहिजे. जो ताकदीने सभा घेईल त्याला बक्षीस मिळणार आहे, ते नंतर सांगतो. पण मागे कधी झाली नव्हती, पुढे कधी होणार नाही, अशी टोलेजंग सभा व्हायला पाहिजे,’ असं अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.