मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काकांमुळे गेलं मुख्यमंत्रीपद? अजितदादांची खदखद पुन्हा बाहेर!

काकांमुळे गेलं मुख्यमंत्रीपद? अजितदादांची खदखद पुन्हा बाहेर!

2004 साली आलेली मुख्यमंत्रीपदाची संधी दवडल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. एकप्रकारे अजित पवारांनी शरद पवारांचा हा निर्णय चुकल्याचं सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 फेब्रुवारी : 2004 साली आलेली मुख्यमंत्रीपदाची संधी दवडल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. एकप्रकारे अजित पवारांनी शरद पवारांचा हा निर्णय चुकल्याचं सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 19 वर्षांपूर्वी नाकारलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या त्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. शरद पवारांना अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

2004 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या, पण तरीही त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं होतं. सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे अजित पवारच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नव्हतं.

अजित पवार यांनी 2004 सालच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असून 2004 मध्ये मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडणं, ही सर्वात मोठी चूक होती, अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. इतकच नव्हे तर मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, तर सत्तेत आम्हीच राहिलो असतो, असंही अजित पवार लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

अजित पवारांनी केलेल्या अन्यायाच्या आरोपांवर उत्तर देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची तारांबळ उडाली आहे. राजकारणात घेतलेला एखादा निर्णय पुढच्या काही वर्षात कसा उलटू शकतो? हे मुख्यमंत्रीपद नाकारायच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणावरून लक्षात येऊ शकतं.

2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादीला 71, काँग्रेसला 69, शिवसेनेला 62 आणि भाजपला 56 जागा मिळाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद नाकारलं आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला, याबदल्यात राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती मिळाली.

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar