पुणे, 05 नोव्हेंबर: दरवर्षी बारामतीत दिवाळीचा (Diwali in Baramati With Pawar Family) वेगळा उत्साह पाहायला मिळतो. पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. मात्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते.
या कार्यक्रमास अजित पवार (Ajit Pawar) मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे ते का आले नाहीत, याची लगेच चर्चा होऊ लागली. मात्र शरद पवारांनी पत्रकार परिषद अजित पवारांच्या अनुपस्थितीचं कारण दिलं आहे. अजित पवारांच्या स्टाफ मधील काही लोक कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे अजित पवार आजच्या कार्यक्रमाला गैरहजर होते, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
हेही वाचा- इंधन दर कपातीवरुन शिवसेनेनं BJP वर साधला निशाणा
तसंच अजित पवारांना ही कोरोना सदृश्य लक्षण असल्याची माहिती पवारांनी दिली. टेस्ट झाली असून रिपोर्ट येणं बाकी असल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे रिस्क नको म्हणून येऊ नका असं अजित दादांना सुचवलं असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अजित पवारांच्या घरातील 3 कर्मचारी कोरोना बाधित तर 2 ड्रायव्हर कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं. कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज्यातील कोरोना संसर्ग, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा- पवार कुटुंबाची आगळीवेगळी दिवाळी, अजित पवार गैरहजर; समोर आलं 'हे' कारण
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाने देखील संप करण्यास मनाई केली आहे. कोर्टाच्या आदेशाचा आदर ठेवावा आणि विषय संपवावा, असं म्हणत पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. एसटी संघटनांचे लोक येऊन भेटले त्यांच्या समस्यांचे निराकरण करायचा प्रयत्न केला. पण सुप्रीम कोर्टानंही त्यांचा संप बेकायदा असल्याचं सांगितलं आहे, असं पवार म्हणालेत.
गेली दोन वर्षे सर्वांना दिवाळीचा आनंद घेता आला नाही. आता कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळं यंदाची दिवाळी जनतेला साजरी करता येत आहे. पण कोरोना नियमांची तयारी असायला हवी आणि ती दिसते. आज देखील हा कार्यक्रम शिस्तीने, खबरदारीने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही घेतल्या, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Coronavirus, Diwali 2021, Sharad Pawar (Politician)