जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवारांनी अजित पवारांकडे पाठवलेल्या दूतांच्या हाती अपयश?

शरद पवारांनी अजित पवारांकडे पाठवलेल्या दूतांच्या हाती अपयश?

शरद पवारांनी अजित पवारांकडे पाठवलेल्या दूतांच्या हाती अपयश?

अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी हे दोन्ही नेते अपयशी ठरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अडीच तास आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन तास अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र हे दोन्ही नेते नेते कुठलीही प्रतिक्रिया न देता बाहेर पडले. याचा अर्थ अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी हे दोन्ही नेते अपयशी ठरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीतून जर काही सकारात्मक चर्चा झाली असली तर त्याच्याबद्दल तसं वक्तव्य राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांकडे केलं असतं. या बैठकीला जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार परत आले असून अजित पवार एकटे पडू नये याकरता आम्ही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांची शिष्टाई अपयशी ठरली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता या भेटीचा वृत्तांत हे दोघेही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याची माहिती कळते आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र वेगळी भूमिका घेत बंडखोरी केली. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही उरकला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. मात्र असं असलं तरीही शरद पवार यांच्याकडून अजूनही डॅमेज कण्ट्रोलसाठी प्रयत्न सुरू आहेत. अजित पवारांचं मन वळवून भाजपचं सरकार उलथून टाकण्यासाठी शरद पवार यांनी आपलं विश्वासू अस्त्र बाहेर काढलं. अजित पवारांची पुन्हा घरवापसी करण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत बैठकीसाठी गेले होते. अजित पवार यांचं मन वळवून त्यांना पुन्हा राष्ट्रवादीसोबत आणण्यात दिलीप वळसे पाटील यांना यश आल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. दरम्यान, अजित पवार यांच्या सोबत संपर्क सुरू आहे. सर्व आमदार आज रात्री परत येतील. आम्ही आज सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची वाट पाहत आहोत, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात