अजित पवारांचा हटके अंदाज, बारामतीकरही झाले अवाक्

अजित पवारांचा हटके अंदाज, बारामतीकरही झाले अवाक्

अजित पवार यांनी आज बारामती शहरात कार चालवत विकासकामांची प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली.

  • Share this:

बारामती, 23 मे : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीत उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच स्वत: कार चालवून शहरातील विकास कामांची पाहणी केली.

बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'बारामती पॅटर्न' राबवला आहे. याच पॅटर्नची राज्यात  अंमलबजावणी होत असून  मास्क, हॅन्डग्लोव्हजच्या वापरासह सातत्याने सॅनेटायझेशन करणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे अशा अनेक कार्यक्रम राबवले जात आहे.  बारामती शहराच्या दौऱ्यावर असताना स्वतः अजित पवारांनी कारचा ताबा घेतला.

हेही वाचा -स्टेनशनला येताच पोलिसांच्या डोळ्यात पाणी, कोरोनावर मात करून पुन्हा ड्युटीवर हजर

बारामतीत विकासकामांची पाहणी करताना अजित पवार यांनी स्वत:च  त्यांच्याकडे असलेल्या टोयाटोच्या लँड क्रुझर गाडी चालवत त्यांनी  अधिकाऱ्यांकडून माहिती  घेतली. विशेष म्हणजे, अजितदादांनी आपल्या गाडीत कुणालाही बसण्याची संधी दिली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादा  सर्व नियमांचे काटेकोरपणे  पालन करत होते. एवढंच नाहीतर, रस्त्यावर राँग साईटवरून दुचाकी चालवणाऱ्यांना देखील अजितदादांनी चांगलेच खडेबोल सुनावले. शिवाय 'स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या', असा सल्ला देखील दिला.

दरम्यान, अजित पवार यांनी स्वत:हून गाडीसोबत कोणताही बंदोबस्त घेतला नव्हता. त्यामुळे  अजितदादा गाडीतून उतरताच  नागरिकांना धक्काच बसला. आता अजितदादाच भेटल्यावर फोटो काढण्याचा मोह बारामतीकरांना झाला. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादांसोबत कुणालाही सेल्फी देखील घेता आला नाही.

हेही वाचा -स्वत:ला मरायचं होतं पण त्याआधी काढला बायकोचा काटा, नंतर उचललं टोकाचं पाऊल

अजित पवार यांनी स्वत: बारामती शहरात कार चालवत विकासकामांची प्रत्येक ठिकाणी जाऊन  पाहणी केली. अजितदादांचे हे रूप अनेक वर्षानंतर बारामतीकर नागरिकांना पाहण्यास मिळाले.

संपादन - सचिन साळवे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 04:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading