स्टेनशनला येताच पोलिसांच्या डोळ्यात पाणी, कोरोनावर मात करून पुन्हा ड्युटीवर हजर

स्टेनशनला येताच पोलिसांच्या डोळ्यात पाणी, कोरोनावर मात करून पुन्हा ड्युटीवर हजर

आतापर्यंत 174 पोलिस अधिकारी तर 1 हजार 497 पोलिस कर्मचारी करोना बाधित आहेत. तर 18 पोलिसांना करोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई 23 मे: मुंबईतील बहुचर्चित जे जे मार्ग पोलिस स्टेशन मध्ये एकाच वेळेस 50 पेक्षा जास्त पोलिसांना करोनाची लागन झाली होती यामुळे मुंबई पोलिस दलात एकच खळबळ माजली होती. पण आता आनंदाची बाब म्हणजे या करोना बाधित पोलिसांनी पैकी आधी 25 आणि आज 03 पोलिसांनी करोनावर मात केली असून ते आपल्या कर्तव्यावर देखील आलेत. आज जे जे मार्ग एपीआय स्टेशनचे पीएसआय सरनाईक, पीएसआय भिसे आणि पोलिस शिपाई झेंडे हे कर्तव्यावर हजर झाले तेव्हा त्यांचे टाळ्या वाजवून आणि त्यांच्यावर फुले टाकून जोरदार स्वागत करण्यात आले. आपले स्वागत पाहून आणि करोनामुळे पोलिसांचे होणारे मृत्यू पाहता या पोलिसांच्या डोळ्यात पाणी तरळलं.

दरम्यान, गेल्या 24 तासात राज्यात 5 पोलिसांना करोनाची लागन झालीये. पोलिसांसाठी ही दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. कारण गेलीकाही दिवस रोज किमान 60 पोलिसांना करोनाची लागन होत होती. तर 20 आणि 21 मे या दोन दिवसांमध्ये तर तब्बल 200 पेक्षा जास्त पोलिसांना करोनाची लागन झाली होती. मात्र गेल्या 24 तासात 05 पोलिसांना करोनाची लागण झाल्याचं आढळल्याने पोलीस विभागाला दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत 174 पोलिस अधिकारी तर 1 हजार 497 पोलिस कर्मचारी करोना बाधित आहेत. तर 18 पोलिसांना करोनामुळे जीव गमवावा लागलाय. आता पर्यंत 541 पोलिसांनी करोनावर मात केलीये.

आनंदाची बातमी! कोरोना व्हॅक्सिनसाठी ऑक्सफर्डमधील संशोधन दुसऱ्या टप्प्यात

राज्यात मुंबई, पुणे आणि औरंगाबादनंतर नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यात 25 मे रोजी रमजान ईद आहे. ईदमुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आखणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यात लॉकडाऊनची अमंलबजावणी आणखी कठोर करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे.

पती-पत्नीला कोरोनामुक्त घोषित करुन फुलांची उधळण, नंतर समोर आली धक्कादायक बाब

 राज्याची उपराजधानी नागपुरात आजपासून केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) तैनात करण्यात आलं आहे. नागपूर शहरात एकूण 80 जवानांची तुकडी दाखल झाली आहे. रेड झोनमध्ये CRPF जवानांना तैनात करण्यात आलं आहे.

First published: May 23, 2020, 3:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading