बारामती, 22 ऑक्टोबर : मनसेच्यावतीने काल (दि.21) मोठ्या दिमाखात दिवाळी निमीत्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दीपोत्सासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत वाढत चाललेली जवळीकता पाहती राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान काल झालेल्या कार्यक्रमावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
यावर अजित पवार म्हणाले की, त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?” म्हणत त्यांनी बोलण्याचे टाळल.
हे ही वाचा : ‘उद्धव ठाकरेंना घाबरून ते तिघे एकत्र येतील, पण…’ महायुतीच्या चर्चांवरुन अंबादास दानवेंचा टोला
शिंदे सरकारचा नियोजन शून्य कारभार
दिवाळीचा शिधा 100 रुपयांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबवण्यात सरकारला अपयश आल्याचे पवार म्हणाले. योजना राबवत असताना त्याचं व्यवस्थित नियोजन करावंच लागतं. नियोजनशून्य कारभार केला, की अशा समस्या निर्माण होतात. काही गोष्टी आहेत, काही नाहीत. दिवाळी झाल्यानंतर सवलतीच्या दरातला शिधा मिळाला तर त्याचा काय उपयोग आहे? त्यांचे मंत्री सांगतायत की पोहोचलाय. पण अजिबात पोहोचलेला नाही. काहींनी सांगितलं की त्याचा काळा बाजार सुरू आहे. 100 रुपयांमधला शिधा कुणी 200 किंवा 300 रुपयांना विकत आहे. हे चुकीचं आहे. त्यात बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.
प्रोत्साहनपर अनुदान हे महाविकास आघाडीचे यश
महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला लागले आहेत. त्याबद्दल या सरकारचे आभार मी मानतो. जे काही नीट होत नाहीये सांगून होत नाहीये त्याबद्दल मला खेद वाटतो आहे. पण अशा प्रकारचा व्यत्यय या सरकारने आणाला हे सरकारचे अपयश असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : ‘मुंबईच्या ठाकरेंची आजही दहशत, NCP च्या नादाला लागाल तर हात…’, देवेंद्र भुयार यांचा थेट इशारा
अनिल देशमुखांना दिलासा मिळेल असे वाटलं होतं
मागच्या एक वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख अटकेत आहेत. दरम्यान त्यांना जामीन मिळण्याची शक्यता होती परंतु त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आम्हाला अस वाटलं होतं जामीन मिळेल पण न्यायव्यवस्थेच्या पुढे आपण काय बोलणार आहोत. असे पवार म्हणाले