औरंगाबाद 22 ऑक्टोबर : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यासोबतच त्यांनी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शुक्रवारी शिवाजी पार्कवर एकत्र आले होते, यावरही प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. हे तिघेही उद्धव ठाकरेंना घाबरून एकत्र येतील, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. मात्र, कितीही येऊ दे आम्ही मुकाबला करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘राजकारणात काहीही होऊ शकतं, गिरीश महाजनांनी दिले नव्या ‘राज’कीय युतीचे संकेत यावेळी बोलताना दानवे म्हणाले, की भोंग्याचं काय झालं? टोलचं काय झालं? असे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांची दहशत आहे. त्यामुळेच ते महापालिका निवडणुकीत एकत्र येतील असं दानवे यावेळी बोलताना म्हणाले. अंबादास दानवे यांनी यावेळी तिन्ही नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, की या तिंघाना लोक मोठे नेते का म्हणतात? हेच मला कळत नाही. एकजण 40 आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला मोठेपणा? याला गद्दारी म्हणतात. एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही आणि फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांना मोठं म्हणायचं का? असं म्हणत त्यांनी तिन्ही नेत्यांना टोला लगावला. Anil Parab Sai Resort : अनिल परबांना मोठा धक्का, साई रिसॉर्ट पाडण्याची वृत्तपत्रात आली जाहिरात! राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले, की राज्यात पावसाने थैमान घातले आहे. अजून शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत पोहचू शकलेली नाही. काही ठिकाणी कमरे एवढं पाणी आहे. त्यामुळे पिकं सडली आहेत. पुढचा हंगामही धोक्यात आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. मात्र, कृषीमंत्री अब्दुल सत्तार असंवेदनशील मंत्री आहेत. म्हणून ओला दुष्काळ जाहीर होत नाही, असं म्हणत त्यांनी सत्तार यांच्यावरही निशाणा साधला. अस्मानीसोबत सुलतानी संकट असताना सरकार उत्सव साजरे करण्यात व्यस्त आहे, असं ते यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.