नवी दिल्ली 8 ऑगस्ट: कोझिकोड मधल्या भीषण विमान अपघाताने (Air India Express Crash) अवघा देश सुन्न झालाय. या अपघातात 14 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. तर 123 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांमध्ये एक चिमुकली मुलगी वाचली आहे. एवढ्या भीषण अपघातामधून ती पालकांपासून दुरावली होती. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता. त्या चिमुकलीला मदत कार्यात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने बाहेर काढलं. तिला थोडं लागलही होतं. नंतर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र तिच्या पालकांचा पत्ता लागत नव्हता. तर विमानतळावर अपघातात अडकलेल्या पालकांच्या जिवाची घालमेल सुरु होती. नंतर काही तासांमध्येच ती आपल्या पालकांडे सुखरुप पोहचली आणि त्या नाट्याचा सुखद शेवट झाला. तोपर्यंत त्या चिमुकलिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थनाही केल्या होत्या. मात्र ती पालकांजवळ सुखरुप आहे अशी बातमी आल्यानंतर सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला. एवढ्या भीषण अपघातातून मुलगी मिळाल्याने आई-वडिलांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. विमान अपघातातील मृतांची संख्या वाढत असून आतापर्यंत 14 जणांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 123 प्रवासी जखमी झाले असून 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत.
A little child was found alone at the accident site. She's being taken to the Kondotty hospital. If anyone knows her,
— #Slavery in Journo—Politics are wrong कानपुर वाला (@AshishCawnpore) August 7, 2020
contact ⏩⏩9048769169 #Kerala #Calicut #AirIndiaExpresspic.twitter.com/DzQDzRfQJ2
एअर इंडियाचं हे विमान रनवेवरून घसरलं आणि विमानाच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. ‘वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं. निष्णात पायलट होते कॅप्टन साठे, 22 वर्षांच्या अनुभवाआधी Airforce मध्येही सेवा अपघातात (Air India Express Crash) विमानाचे पायलट दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. Airforce मध्ये विंग कमांडर असलेले साठे हे कुशल पायलट म्हणून ओळखले जात होते. त्यांना विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. अतिशय निष्णात पायलट म्हणून त्यांची ख्याती होती. हवाई दलातल्या उत्कृष्ट सेवेनंतर त्यांनी एअर इंडियात पायलट म्हणून काम करत होते. तिथेही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. एअर इंडियात त्यांनी 22 वर्ष सेवा दिली होती. विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव पुण्यातल्याा NDAचे विद्यार्थी असलेले साठे हे कायम हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. हवाई दलातची त्यांनी ने प्रकारची लढाऊ विमाने हाताळली होती. पण आज त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यातच कर्तव्यावर असतानाच त्यांना मृत्यू आला.