Air Crash: निष्णात पायलट होते कॅप्टन दीपक साठे, 22 वर्षांच्या अनुभवाआधी Airforce मध्येही उडवली होती लढाऊ विमानं

Air Crash: निष्णात पायलट होते कॅप्टन दीपक साठे, 22 वर्षांच्या अनुभवाआधी Airforce मध्येही उडवली होती लढाऊ विमानं

पुण्यातल्याा NDAचे विद्यार्थी असलेले साठे हे कायम हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते.

  • Share this:

नवी दिल्ली 7 ऑगस्ट: केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात (Air India Express Crash) विमानाचे पायलट दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. Airforce मध्ये विंग कमांडर असलेले साठे हे कुशल पायलट म्हणून ओळखले जात होते. त्यांना विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. अतिशय निष्णात पायलट म्हणून त्यांची ख्याती होती. हवाई दलातल्या उत्कृष्ट सेवेनंतर त्यांनी एअर इंडियात पायलट म्हणून काम करत होते. तिथेही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. एअर इंडियात त्यांनी 22 वर्ष सेवा दिली होती.

पुण्यातल्याा NDAचे विद्यार्थी असलेले साठे हे कायम हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. हवाई दलातची त्यांनी ने प्रकारची लढाऊ विमाने हाताळली होती. पण आज त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यातच कर्तव्यावर असतानाच त्यांना मृत्यू आला.

विमान अपघातातील मृतांची संख्या वाढत असून आतापर्यंत 14 जणांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 123 प्रवासी जखमी झाले असून 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत.

टेबल टॉप धावपट्टीमुळे झाला अपघात? जगातली अशी 5 सर्वात धोकादायक विमानतळं कुठली

दरम्यान, एअर इंडियाचं हविमान रनवेवरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. 'वंदे भारत मिशन'च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं.

विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव

कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यात इथे पाऊस होता. त्यामुळे कदाचित पायलटला अंदाज आला नसावा. त्यामुळे 30 फूट खाली ते घसरलं आणि त्यातून हा अपघात झाला.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 7, 2020, 11:36 PM IST
Tags: air crash

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading