अहमदनगर, 30 नोव्हेंबर : विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, कुटुंबीय दोघांनाही त्रासल्या जात असल्याचे तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न श्रीगोंदा तालुक्यातील घोटी येथील सरपंच अविनाश चव्हाण यांनी केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावात निवडणुका झाल्यानंतर अविनाश चव्हाण हा या गावचा सरपंच झाला. त्यानंतर त्याचं गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध जुळले. या प्रकरणाची गावात कुणकुण लागल्यानंतर विवाहितेच्या पतीने आणि त्याच्या घरच्यांनी याला विरोध केला.
(सुनेवर ठेवली वाईट नजर, मुलाने केला वार.. नवऱ्याचे 22 तुकडे केल्याचे आरोपी महिलेची कबुली)
संबंधित महिलेला पतीने माहेरी पाठवून दिले. माहेरी गेल्यानंतर आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार महिलेने प्रेमी सरपंच भोसले यांच्याकडे केली. त्यानंतर म्हणाले दोघांचे प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आम्हाला त्रास देत असल्याची तक्रार करण्यासाठी प्रेमवीर सरपंच अविनाश भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
(चोरी करायला गेला अन् जीव गमावला, चोरासोबतच घडलं भयंकर; पाहून पोलीसही चक्रावले)
जिल्ह्याधिकाऱ्यांना अविनाश भोसले याने एक पत्र लिहिले. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आम्हाला सोबत राहू देत नाही, असं म्हणत भोसले याने कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्याला स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रकरणावर तोडगा कसा काढावा असा मोठा प्रश्न आता जिल्हाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news